'या' आहेत भारतातील टॉप 10 कंपन्या, हुरुन इंडियाने जाहीर केली यादी (फोटो सौजन्य _सोशल मीडिया)
Hurun India 500 List Marathi News: अॅक्सिस बँकेच्या बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरून इंडियाने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे.
हुरुन इंडियाने भारतातील टॉप १० मौल्यवान कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले स्थान भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आहे. अॅक्सिस बँकेच्या बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरून इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये आहेत. भारतातील टॉप ५०० कंपन्यांचे एकत्रित मूल्य ३.८ ट्रिलियन डॉलर्स आहे, जे भारताच्या स्वतःच्या जीडीपी आणि संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि स्पेनच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.
या सर्व कंपन्यांनी देशांतर्गत शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 पेक्षा चांगली कामगिरी केली आहे, जे अनुक्रमे २७ टक्के आणि ३० टक्क्यांनी वाढले आहेत, तर कंपन्यांची सरासरी वाढ ४०टक्के होती.
१. रिलायन्स इंडस्ट्रीज: मूल्य: ₹१७,५२,६५० कोटी
२. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): मूल्यः ₹१६,१०,८०० कोटी
३. एचडीएफसी बँक: मूल्यः ₹१४,२२,५७० कोटी
४. भारती एअरटेल: मूल्यः १९,७४,४७० कोटी
५. आयसीआयसीआय बँक: मूल्यः १९,३०,७२ कोटी
६. इन्फोसिस: मूल्यः ₹७,९९,४० कोटी
७. आयटीसी: मूल्य: ₹५,८०,६७० कोटी
८. लार्सन अँड टुब्रो: मूल्यः ₹५,४२,७७० कोटी
९. एचसीएल टेक्नॉलॉजीज: मूल्यः ₹५,१८,१७० कोटी
१०. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई): मूल्यः ₹४,७०,२५० कोटी
टाटा सन्स ही सर्वात मूल्यवान औद्योगिक कंपनी होती, तिच्या अंतर्गत १५ कंपन्या आहेत, ज्यांचे शेअर्स ३७ टक्क्यांनी वाढून ३२.२७ लाख कोटी रुपये झाले. टॉप ५०० कंपन्यांच्या एकूण मूल्यात या समूहाचा वाटा १०टक्के आहे.
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ही यादीतील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती, ज्यात वार्षिक मूल्य वाढीचा दर २९७ टक्के होता. आता आयनॉक्स विंड आणि झेप्टो या कंपन्या वेगाने वाढत आहेत.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ही भारतातील सर्वात मौल्यवान नॉन-लिस्टेड कंपनी आहे. २०२४ मध्ये त्याचे मूल्य २०१ टक्क्यांनी वाढून ₹४.७ लाख कोटी होण्याची अपेक्षा आहे.