अकलूज : मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथील ऊसताेडणीचे मजूर ठेकेदारामार्फत ऊसताेडणीची उचल म्हणून काही रक्कम घेऊन काही दिवसांपूर्वी १३ स्त्री-पुरूष वाफेगाव येथील शेतकऱ्याकडे आले हाेते. मात्र, ऊस ताेडणीवरून शेतमालक व मजूरात काही शाब्दिक वादविवाद झाल्याने मालकांनी सर्व मजुरांना त्यांच्या मूळ गावी मध्यप्रदेशला जाण्यास अडथळा निर्माण केला.
त्यानंतर यातील काही मजुरांनी सर्व हकीकत गावाकडे कळवली. बुऱ्हाणपूर येथे पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंद करण्यात आली. या तक्रारीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि संबंधित मजुरांना परत आणण्याचे आदेश दिले. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मदत केली आणि या मजुरांची सुटका झाली.