
रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हॅण्डलवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे.यामुळे आरबीआय जगातील पहिली अशी मध्यवर्ती बँक ठरली आहे की जिचे इतके फॉलोअर्स आहेत. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रविवारी आपल्या ट्विटवरवरुन दिली.
RBI Twitter account reaches one million followers today. A new milestone. Congratulations to all my colleagues in RBI. — Shaktikanta Das (@DasShaktikanta) November 22, 2020
शक्तिकांत दास म्हणाले, “आरबीआयच्या ट्विटर अकाउंटने आज १ मिलियन फोलॉअर्सचा टप्पा पार केला. आरबीआयमधील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.” रिझर्व्ह बँक ही एक अशी बँक आहे ज्या बँकेची धुरा जगातील अनेक चांगल्या तज्ज्ञ आणि आघाडीच्या लोकांनी सांभाळली आहे. ८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि जगाला आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.
आरबीआयने ट्विटरवर आपलं अकाउंट जानेवारी २०१२मध्ये तयार केले आहे. आरबीआयची दोन ट्विटर अकाउंट आहेत. सुरुवातीच्या ट्विटर अकाउंटद्वारे बँकेच्या महत्वाच्या धोरणांबाबत माहिती दिली जात आहे. तर नव्या ट्विटर अकाउंटव्दारे लोकांमध्ये बँकिंग व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात येते.