औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील बाजार समितीमध्ये अचानक पद्धतीने लिंबूचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे. मार्च महिन्यात दोनशे रुपये किलो असलेला लिंबू आज अचानक ५० रुपये किलोवर आला आहे. यासंदर्भात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी माहिती दिली की, परराज्यातून लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समिती या बाजारपेठेत झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील लिंबूच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. आणि अचानकपणे वातावरणातील झालेला बदल वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस, याचा सुद्धा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
[read_also content=”इंडोनेशिया पामतेल निर्यातीवरील बंदी उठवणार , शेतकऱ्यांची जकार्ता येथे निदर्शने https://www.navarashtra.com/world/indonesia-lifts-ban-on-palm-oil-exports-farmers-protest-in-jakarta-nrab-282204.html”]
गेल्या दोन महिन्यापासून लिंबूला चांगली बाजारपेठ आणि चांगला भाव मिळाला होता यामध्ये शेतकऱ्यांना चांगली कमाई होत होती. मात्र अचानकपणे इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या बाजारपेठेमध्ये लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक केल्याने जिल्ह्यातील लिंबूचे भाव अचानक कमी झाले आहे. अशी प्रतिक्रिया काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी दिली आहे.
[read_also content=”राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगितीनंतर बृजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले बृजभूषण? ‘वाचा’ https://www.navarashtra.com/maharashtra/brij-bhushan-first-reaction-after-the-postponement-of-raj-thackerays-ayodhya-tour-what-did-brij-bhushan-say-282316.html”]