Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी शेअर केला खास अनुभव!

सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी त्यांच्या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे मालिका पूर्ण केली. 

  • By Sanchita Thosar
Updated On: Jul 11, 2021 | 11:47 AM
‘समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी शेअर केला खास अनुभव!
Follow Us
Close
Follow Us:

‘समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी म्हटले आहे की या सिझनचे दिग्दर्शन करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती कारण एकतर ते पहिल्यांदाच वेब मालिकेचे दिग्दर्शन करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे चित्रीकरण कोविड साथरोगाचे लॉकडाऊन सुरु असताना होत होते. पण या सर्व आव्हानांवर मात करत त्यांनी त्यांच्या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे मालिका पूर्ण केली. 

‘समांतर’च्या सिझन-१ ला अभूतपूर्व असे यश मिळाले. या वेब मालिकेला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकांनी पसंती दिली आणि त्याच पार्श्वभूमीवर समांतर-२ ‘एमएक्स प्लेयर’वर सुरु झाली आहे. नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत तसेच सई ताम्हणकर यांच्या भूमिका या सिझनमध्ये आहेत. त्यामुळे या सिझनला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. ही वेब मालिका प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या लोकप्रिय मराठी कादंबरीवर आधारित आहे. 

या मालिकेबद्दल बोलताना समीर विद्वांस म्हणाले, “समांतर’ ही नाट्यमय मालिका असून ती गूढता व रोमांचाने पुरेपूर भरलेली आहे आणि त्यामुळे ती रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मराठीमध्ये तयार झालेल्या या वेब मालिकेचा पहिला सिझन हिंदी, तेलगु आणि तमिळ या भाषांमध्ये पुढे डब झाला. या वेब मालिकेचा दुसरा सिझन आम्ही मुंबई, पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, भोर आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यामध्ये चित्रित केला आहे. त्यामुळे या मालिकेचा नैसर्गिक लुक कायम राहिला आहे.”

‘समांतर-२’ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी समीर विद्वांस यांनी अर्जुन आणि कार्तिक यांचे आभार मानले आहेत. या दोघांनी या मालिकेमध्ये सर्जनशीलपणे लक्ष घातले आणि दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. “ते नवीन संकल्पनांचा खुल्या दिलाने स्वीकार करतात आणि त्या प्रत्यक्षात कशा येतील यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांनी ‘समांतर’च्या निर्मितीच्या काळात कलाकार आणि माझ्याबरोबर अगदी जवळून काम हेले आणि प्रत्येकजण सर्वोत्तम कामगिरी करेल हे पहिले,” असेही ते म्हणाले.

‘समांतर-२’बद्दल बोलताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “समांतर’ची कथा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडेल आणि ते ती उचलून धरतील याची आम्हाला पूर्ण खात्री होती. समांतर-२ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रर्तिसाद मिळतो आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पुढेही विविध विषय आणि प्रकारांवर आधारित आणखीही चांगल्या वेब मालिका आम्हाला करायच्या आहेत.” 

जीसिम्सने केत्येक गाजलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांमध्ये मोगरा फुलला, बोनस, फुगे, तुला काळणार नाही, रणांगण आणि विकी वेलिंगकर यांचा समावेश आहे. ‘नक्सलबारी’ ही झी-5वर प्रसारित झालेली आणि समांतर १ व २ या ‘एमएक्स प्लेयर’वर प्रसारित झालेल्या वेब मालिकेच्या माध्यमातून जीसिम्सणे पुन्हा एकदा तो दर्जेदार कॉन्टेट देणारा स्टुडीओ असल्याचे सिद्ध केले आहे.

Web Title: Samantar 2 director samir vidwans shares experience about web series nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2021 | 11:47 AM

Topics:  

  • about web series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.