मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपल्या पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मनात काय चाललेले असते हे कोणालाही माहिती नसते, असे त्यांच्या जवळचे लोकही अनेकदा सांगताना दिसतात. शरद पवार यांनी अनेकदा चौकटीच्य पलीकडे जाऊन अनेक धाडसी निर्णयही घेतले आहे. अशातच राज्यातील बदल्या राजकीय वातावरणात त्यांनी पुन्हा एकदा एक धाडसी निर्णय घेऊन आपल्या पुरोगामी विचारांची झलक दाखवून दिली आहे.
हेदेखील वाचा: तुम्हीही रात्री उशीरा जेवताय? वेळीच व्हा सावध अन्यथा गंभीर आजार घेरतील
राष्ट्रवादी शरद पवार गटाने LGBTQ+ समुदायाचे अनिश गवांदे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. अनिश गवांदे हे ‘गे’ अर्थात समलिंगी असून त्यांनी आपली ही ओळख अगदी जाहीरपणे घेऊन समाजात वावरत असतात.राष्ट्रवादी शरद पवार गटाने अनिश यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी अनिश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रात अशा प्रकारे नियक्ती होणारे अनिश हे पहिलेच समलिंगी व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या निवडीला सामाजिकच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.
राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. त्यातच राजकीय क्षेत्र आणि राजकारण म्हटंल की त्याचीही एक चौकट असते. पण महाराष्ट्राचं राजकारण मात्र ही चौकट ओलांडली आहे. अनिश यांच्या नियुक्तीमुळे तरूणवर्गासह LGBTQ+ समुदायामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अनिश यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेदेखील वाचा: भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अनिश यांनी 2019साली ‘पिंक लिस्ट इंडिया’ ही यादी तयार केली होती. या यादीत LGBTQ+ समुदायाचे प्रश्न मांडणाऱ्या आमि त्यांच्या मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्या देशभरातल्या नेत्यांचा समावेश होता.