Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच कृषिमंत्री झाल्यानंतर आलेला बाका प्रसंग; शरद पवारांकडून अस्वस्थ करणाऱ्या घटनेला उजाळा

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी देशाची कृषी व्यवस्था ढासळलेल्या अवस्थेत कृषिमंत्री म्हणून आलेल्या अनुभवांना उजाळा दिला.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 11, 2023 | 03:31 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा रविवारी मुंबईत पार पडला. यावेळी त्यांनी त्यांना कृषिमंत्री म्हणून आलेल्या अनुभवांना उजाळा दिला. ‘आपला देश कृषिप्रधान देश असल्याचे आपण बोलतो, पण मी कृषिमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्याकडे पहिलीच फाइल ही ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करण्याबाबत आली होती. ती फाइल ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा मी अस्वस्थ झालो होतो,’ अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईत जागवली. त्याचवेळी कृषीक्षेत्रातील संशोधकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पुढील पाच ते सहा वर्षांत ही परिस्थिती बदलली. आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा

पवार यांच्या हस्ते शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचे त्यांनी अभिनंदनही केले.

जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करणार

‘आपला देश हा कृषिप्रधान आहे. शेतीच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आपला देश स्वत:ची गरज भागवून जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करीत आहे,’ असे पवार यांनी नमूद केले. तर साहित्याच्या क्षेत्रात नवनवीन लेखक येत आहेत. इतरांना प्रेरित करीत आहेत. हे चित्र पुणे-मुंबईपर्यंत नाही, तर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण वाचायला मिळते, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawar inspire fellowship awarding ceremony on that time sharad pawar share disturbing incident nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2023 | 03:31 PM

Topics:  

  • NCP president Sharad Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.