Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा बावड्यातील पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेना मदत करणार : राजेश क्षीरसागर

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 23, 2021 | 01:09 PM
कसबा बावड्यातील पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेना मदत करणार : राजेश क्षीरसागर
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : हिंदुत्वाच्या विचाराचा कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वेळोवेळी कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असून, गेल्या बारा वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वीच्या महापुराच्या आठवणी ताज्या असताना पुन्हा यावर्षी महापुराने कहर केला. याचा फटका कसबा बावड्यातील हजारो कुटुंबाना बसला असून, मदत नाही तर कर्तव्य या भावनेतून कसबा बावड्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कसबा बावडा परिसरात शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपास सुरवात करण्यात आली. येथील शिवनेरी, शिवसेना विभागीय कार्यालय येथून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १०० कुटुंबाना शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले. या आठवड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कसबा बावड्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना घरोघरी या शिवसहाय्य जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सामाजिक काम करत नाही. निवडणुकीत कमी मते पडली म्हणून त्या भागाकडे दुर्लक्ष करायचे हि शिकवण शिवसेनाप्रमुखांची नाही. त्यामुळे गेल्या दोन वेळच्या आमदारकीच्या काळाप्रमाणे या दोन वर्षातही कसबा बावडावासियांशी आपले नाते अतूट आहे. मुळातच हिंदुत्वावादी विचार कसबा बावडा वासीयांच्या मनात रुजले गेले असल्याने कसबा बावडावासीयांच्या मनात शिवसेनेने स्थान निर्माण केले आहे. कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे.

राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता २५ लाख, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यांमधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास आदि कामांसाठी आजतागायत २ कोटींच्या वर निधी वितरीत केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीची सुधारणा, पाणंद्यांचा विकास, विविध ठिकाणी ओपन जिम, खेळणी, हायमास्ट लँम्प आदी विकास कामे करण्यात आली आहेत.

कसबा बावडा वासीयांच्या सोबत कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. कसबा बावडावासीयांच्या प्रत्येक सुख:दुखात सामील झालो आहे. मग ते गणेशोत्सव, शिवजयंती असो, बावडा महोत्सव असो किंवा कट्टर शिवसैनिकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना दिलेला आधार असो प्रत्त्येक ठिकाणी शिवसेना हे नाते आपुलकीने जपत आहे.

गेल्यावेळच्या महापुरात घरोघरी मदत, जनावरांना दोन टन गोळीपेंड, लाखो रुपयांची औषध वाटप करण्यात आली होती. यावर्षीही महापुराचा फटका बावडा वासियांना बसला असून, पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला शिवसेना मदत करणार आहे. त्याचबरोबर पुढील काळातही नियोजित कामांद्वारे कसबा बावड्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना कसबा बावडा परिसरातील भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक अक्षय विजय खोत यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख रविंद्र माने, राजू काझी, संजय लाड, उदय जाधव, गुरुदास ठोंबरे, राहुल माळी, अक्षय खोत, कपिल पोवार, विनायक बोनगे, सचिन पाटील, सचिन वावरे, दयानंद गुरव, जालिंदर पोवार, आदर्श जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv sena to help flood hit family in kasba bawda says rajesh kshirsagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2021 | 01:09 PM

Topics:  

  • Rajesh Kshirsagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.