Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! मानेवरही पडतात सुरकुत्या; जाणून घ्या याचे दुष्परिणाम

मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणारे नॉन- ऑयनायजिंग रेडिएशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अतिशय हानिकारक आहेत. तज्ज्ञांनी यासंदर्भातील समस्यांविषयी सांगितले आहे. मोबाईल फोनच्या अत्यधिक वापरामुळे त्वचेचे काय नुकसान होऊ शकते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 17, 2021 | 01:18 PM
स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! मानेवरही पडतात सुरकुत्या; जाणून घ्या याचे दुष्परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. परंतु, दीर्घकाळ मोबाईल फोन वापरणे आपल्या आरोग्यास आणि त्वचेस हानी पोहोचवू शकते. गेल्या काही वर्षांत, मोबाईल फोनमधून उत्सर्जित हानिकारक रेडिएशनबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या किरणोत्सर्गाचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीराच्या अवयवांवर होतो.

मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणारे नॉन- ऑयनायजिंग रेडिएशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अतिशय हानिकारक आहेत. तज्ज्ञांनी यासंदर्भातील समस्यांविषयी सांगितले आहे. मोबाईल फोनच्या अत्यधिक वापरामुळे त्वचेचे काय नुकसान होऊ शकते, ते आज आपण जाणून घेऊया…

  • त्वचेचा लालसरपणा आणि खाज सुटणे

डर्मेटीस ही एक जेनेरिक टर्म आहे, जी त्वचेवर सूज आल्यावर वापरली जाते. फोनचा जास्त वापर केल्याने चेहऱ्यावर लालसरपणा, खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

[read_also content=”हा स्पर्श जीवाला लावी पिसे, Google Pay चं नवं Feature : ना टच, ना स्वाईप… आता डेबिट-क्रेडिट कार्डही होणार डिजिटल https://www.navarashtra.com/latest-news/google-pay-tokenization-card-feature-adds-more-banks-federal-bank-indusind-sbi-bank-use-debit-credit-card-nrvb-143447.html”]

  • फाईन लाईन्स आणि सुरकुत्या

कदाचित आपणास हे माहित नाही की, बराच काळ मोबाईल फोन वापरल्यामुळे चेहर्‍यावर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या येतात. यामुळे, आपण वेळेआधीच वृध्द दिसू लागता. बराच वेळ मोबाईल फोनवर चॅटिंग करत असताना किंवा वाचत असताना आपण सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत असतो. यामुळे कपाळावर बारीक रेषा दिसू लागतात.

  • डार्क सर्कल्स

मोबाईल फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन वाढते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. याशिवाय आपल्या झोपेवर देखील वाईट परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स दिसू लागतात.

[read_also content=”स्पर्धा होणार अधिक तीव्र : जिओच्या आधी आले Airtel चे 5G; टेस्टिंगमध्ये मिळाला 1Gbps पेक्षा जास्त स्पीड https://www.navarashtra.com/latest-news/bharti-airtel-more-faster-5g-trial-gurugram-got-over-1gbps-speed-testing-nrvb-142715.html”]

  • त्वचेवर संक्रमण

मोबाईल फोनवर आजूबाजूच्या वातावरणात असलेले बरेच प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया चिकटलेले असतात. हे बॅक्टेरिया आपल्या त्वचेला देखील संक्रमित करतात.

  • मानेवरील सुरकुत्या

दीर्घकाळ मोबाईल फोन वापरल्यामुळे मानेवर देखील सुरकुत्या येऊ शकतात आणि गळ्याची त्वचा काळपट आणि जाडसर दिसू लागते.

smart phones also damage your skin know the side effects in details

Web Title: Smart phones also damage your skin know the side effects in details nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2021 | 01:15 PM

Topics:  

  • know
  • जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.