Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलर सिस्टर्स आणि युनायटेड वे मुंबई यांना फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्रांट डे प्रोग्रामअंतर्गत प्रत्येकी ५०,००० डॉलर्सचे दान

युनायटेड वे मुंबई ही संघटना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या विविध प्रकल्पांमध्ये मदत करते. यामध्ये शहरी वनीकरण, खारफुटींना संरक्षण आणि पाणलोट क्षेत्राचा विकास अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून स्थानिक नागरी समित्यांच्या प्रयत्नांना साथ दिली जाते तसेच पर्यावरण संरक्षणामध्ये नागरिकांना देखील सामावून घेतले जाते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 05, 2021 | 01:30 PM
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलर सिस्टर्स आणि युनायटेड वे मुंबई यांना फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्रांट डे प्रोग्रामअंतर्गत प्रत्येकी ५०,००० डॉलर्सचे दान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : फेडेक्स कॉर्प.ची (एनवायएसई: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक सेवा पुरवठादार फेडेक्स एक्सप्रेसने भारत आणि आफ्रिकेतील पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रातील कार्यरत प्रकल्पांना प्रत्येकी $५०,००० यूएस डॉलर्स दान करणार असल्याची घोषणा केली आहे.

फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्लोबल ग्रांट प्रोग्रामअंतर्गत हजारो फेडेक्स टीम सदस्यांनी विना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या १२ संस्थांची निवड केली आहे. फेडेक्स ज्या सहा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे तेथील या संघटना असून, पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठीच्या एकूण $६००,००० यूएस डॉलर्सच्या फेडेक्स गुंतवणुकीतून त्या प्रत्येक संघटनेला $५०,००० यूएस डॉलर्सचे अनुदान देण्यात येणार आहे.

मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिकेचे क्षेत्रीय अध्यक्ष जॅक मूस यांनी सांगितले, “पर्यावरणावर सर्वात जास्त प्रभाव होत असलेल्या ठिकाणी त्यामध्ये घट करण्यासाठी फेडेक्सने महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये आखली आहेत. विना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संघटनांसोबत काम करणे आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करणे हा आपल्या जगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि नवनवीन उपाययोजनांना वेग देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे.”

[read_also content=”सिंहांवरही कोरोनाचे सावट : चेन्नईला लागून असलेल्या वंदलूरमधील प्राणी संग्रहालयात ९ वर्षाच्या सिंहिणीचा मृत्यू, ११ पैकी ९ सिंहांना झालाय संसर्ग https://www.navarashtra.com/latest-news/lions-also-infected-by-corona-in-chennai-zoo-swab-and-stool-samples-were-sent-to-bhopal-nrvb-138275.html”]

युनायटेड वे मुंबई ही संघटना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या विविध प्रकल्पांमध्ये मदत करते. यामध्ये शहरी वनीकरण, खारफुटींना संरक्षण आणि पाणलोट क्षेत्राचा विकास अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून स्थानिक नागरी समित्यांच्या प्रयत्नांना साथ दिली जाते तसेच पर्यावरण संरक्षणामध्ये नागरिकांना देखील सामावून घेतले जाते.

युनायटेड वे मुंबईचे सीईओ जॉर्ज ऐकारा यांनी सांगितले, “फेडेक्सकडुन दिल्या जाणार असलेल्या सहयोगामुळे मुंबईच्या पाणथळ भागांमध्ये खारफुटीची रोपे लावून त्यांची देखरेख करण्याच्या कामी युनायटेड वे मुंबईला मदत होईल. शहरातील समुद्रकिनारे स्वच्छ करून समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये देखील मोलाची साथ मिळेल. आम्ही त्यांच्या या सहयोगाबद्दल आभारी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, समाजात दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये हे खूप मोठे योगदान ठरेल.”

फेडेक्स केयर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे भेट द्या.

ज्या भागांमध्ये आजही वीज नाही तिथे वीज पोहोचवण्यासाठी, महिलांकडून चालवल्या जात असलेल्या उद्योगांमार्फत हरित ऊर्जा उत्पादन करून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम सोलर सिस्टर करत आहे. त्यांना आर्थिक मदत पुरवली गेल्याने महिलांचे अधिक मोठे नेटवर्क निर्माण करण्यासाठी साहाय्य, प्रशिक्षण आणि सेवा यांचे सर्वसमावेशक पॅकेज तयार करता येईल आणि आफ्रिकेतील ग्रामीण भागांमध्ये दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या समुदायांना शुद्ध ऊर्जा तंत्रज्ञान पुरवता येईल.

[read_also content=”१० रुपयांत मिळेल बंदुकीचं लायसन्स; पण त्याआधी करावी लागेल या गोष्टींची पूर्तता, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/get-gun-license-for-rupees-10-but-before-that-you-have-to-fulfill-these-things-read-in-detail-nrvb-138265.html”]

सोलर सिस्टर, आयएनसीच्या संस्थापिका व सीईओ कॅथरीन ल्युसी यांनी सांगितले, “शाश्वत भविष्यासाठी दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी आमच्या मूल्यांना आणि आमच्या उद्धिष्टांना साथ दिल्याबद्दल आम्ही फेडेक्सचे आभारी आहोत. दुर्गम भागांतील महिला उद्यमींच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे हा शुद्ध ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हानांवरील उपाययोजनांचा एक महत्त्वाचा भाग आहे. फेडेक्सच्या मदतीमुळे आम्हाला आफ्रिकेतील उप-सहारा क्षेत्रातील अधिक समुदायांपर्यंत आमच्या मॉडेलचा विस्तार करण्यात, महिला उद्योजक, त्यांची कुटुंबे आणि त्यांच्या समुदायांवरील आमचा प्रभाव अधिक पटींनी वाढवण्यात आम्हाला मोठी साथ मिळेल.”

प्रायॉरिटी अर्थ ग्लोबल ग्रांट प्रोग्रामचा एक भाग म्हणून करण्यात येत असलेली ही नवी गुंतवणूक सध्या सुरु असलेल्या फेडेक्स आणि या संघटनांमधील समन्वयाचा एक भाग आहे, ज्यामार्फत वातावरणातील बदलांच्या समस्येच्या निवारणासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. २०४० पर्यंत संपूर्ण जगभरातील आपले संचालन कार्बन-न्यूट्रल करण्यासाठी फेडेक्सने घेतलेल्या संकल्पाला अनुसरून हे पाऊल उचलले जात आहे.

Solar Sisters and United Way Mumbai donate 50000 each under the FedEx Priority Earth Grant Day Program to mark World Environment Day

Web Title: Solar sisters and united way mumbai donate 50000 each under the fedex priority earth grant day program to mark world environment day nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2021 | 01:30 PM

Topics:  

  • FedEx

संबंधित बातम्या

बेरोजगारीचा टक्का घसरणार? FedEX च्या प्रशिक्षण उपक्रमाने हजारो युवकांना नोकऱ्या!
1

बेरोजगारीचा टक्का घसरणार? FedEX च्या प्रशिक्षण उपक्रमाने हजारो युवकांना नोकऱ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.