
१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
१९२५: अॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
१९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
१९९६: तामिळ टायगर्सने श्रीलंकेचा सैन्यतळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.