Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषक 2024 चे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधीचे नुकसान; थेट ICC कडे केली सवलतीची मागणी

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप 2024 हा भारतीय संघासाठी एकदम भारी राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. परंतु, याचे प्रक्षेपण करणाऱ्या एका चॅनलला याचा मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. आता या चॅनलने थेट ICC कडे सवलत मागितली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 26, 2024 | 05:27 PM
Broadcast Star Sports demand for discount to ICC

Broadcast Star Sports demand for discount to ICC

Follow Us
Close
Follow Us:

Broadcaster Asked For Discount From ICC : भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 वर आपले नाव कोरत जगभरात आपली छाप सोडली. यंदाचा विश्वचषक भारतीय संघासाठी एकदम भारी राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 29 जून रोजी बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या संस्मरणीय फायनलमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने 11 वर्षांपासून सुरू असलेला विजेतेपदाचा दुष्काळही संपवला.
एका चॅनलला सोसावे लागलेय मोठे नुकसान
टी-20 वर्ल्ड कप 2024 ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी अजिबात चांगला राहिला नव्हता. आयसीसी आणि स्टार यांच्यातील 3 अब्ज डॉलरचा करार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपपासून लागू झाला होता. ‘क्रिकबझ’ च्या एका अहवालानुसार, स्टार स्पोर्ट्स विविध कारणांमुळे स्पर्धेच्या एकूण मूल्यांकनावर सूट देण्याची मागणी करत आहे.
दोन पत्रे लिहून उत्तराच्या प्रतीक्षेत
अहवालानुसार, स्टारने आयसीसीला दोन पत्रे लिहिली आणि गेल्या महिन्यात कोलंबो येथे झालेल्या वार्षिक परिषदेत या मुद्द्यावर चर्चा केली. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, अंतिम निर्णय बोर्डावर अवलंबून असेल.
हा वर्ल्ड कप भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेला हा वर्ल्ड कप भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला, पण सर्वांना त्याचा फायदा झाला नाही. आता एक अपील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत पोहोचले आहे, ज्यामध्ये 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 830 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि याबद्दल बोलले गेले आहे.
830 कोटींची सूट देण्याची मागणी
विविध कारणांमुळे स्टार वर्ल्ड कपमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 830 कोटी रुपये) पेक्षा जास्त डिस्काउंटची मागणी करीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही सूट देण्याची मागणी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील रद्द झालेला सामना असल्याचे सांगितले जात आहे.
चॅनलने दिलेय नुकसानीचे कारण
भारत-कॅनडा व्यतिरिक्त, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेपाळ यासारखे काही सामने देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे आता स्टार आयसीसीला कितपत पटवून देण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लो स्कोअरिंग सेमीफायनलवरही चिंता व्यक्त केली, जिथे अफगाणिस्तान 56 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यानंतर अवघ्या 9 षटकात लक्ष्य गाठून आफ्रिकेने विजय मिळवला.

 

Web Title: Star sports loses crores of rupees despite team india winning t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 05:26 PM

Topics:  

  • T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
1

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.