Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत बनला विश्वचॅम्पियन! टी-20 विश्वचषकात भारताने मारली बाजी; सूर्याने कॅच नाही मॅच पकडली, 7 धावांनी दिली अफ्रिकेला मात

भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 176 धावांचे लक्ष्य दिले. द. अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली परंतु, नंतर क्विंटन डी कॉक आणि क्लासेनची खेळी मॅच अफ्रिकेकडे घेऊन गेली. पण, क्लासेनची विकेट त्यानंतर सूर्याने घेतलेला कॅच नव्हता तर ती मॅच होती. अफ्रिकेला 7 धावांनी दिली मात अन इंडिया बनला world Champion

  • By युवराज भगत
Updated On: Jun 30, 2024 | 12:01 AM
India became world champion 2024

India became world champion 2024

Follow Us
Close
Follow Us:

T20 World Cup 2024 IND vs SA Match Live : सर्व क्रिकेट शौकिनांचे लक्ष्य लागून राहिलेल्या भारत विरुद्ध द. अफ्रिका अंतिम सामना (T20 World Cup 2024 SA vs IND Final Match) आज बारबाडोसच्या मैदानावर सुरू होण्यासाठी काही क्षणांचा उशीर आहे. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आलेला आहे. या T20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेला कोणीही पराभूत करू शकलेले नाही.

 

अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष्य लागून राहिलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत विरुद्ध द. अफ्रिका सामन्यात (IND vs SA Final Match) आमने-सामने आहेत. आज टी-20 विश्वचषक 2024 मधील अंतिम सामन्यात भारत विरुद्ध द. अफ्रिका कोणाचे स्वप्न साकार होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारत या वर्षात वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहचले.

भारत बनला विश्वचॅम्पियन

𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆#TeamIndia 🇮🇳 HAVE DONE IT! 🔝👏

ICC Men's T20 World Cup 2024 Champions 😍#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/WfLkzqvs6o

— BCCI (@BCCI) June 29, 2024

भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

🇿🇦 🆚 🇮🇳, #T20WorldCup 2024 Final, it doesn't get any better 🤩

Rohit Sharma wins the toss and elects to bat first in Barbados.#SAvIND | 📝: https://t.co/YbpUMrttNv pic.twitter.com/PERb26iq6d

— ICC (@ICC) June 29, 2024

ओव्हल मैदानावर दोन्ही संघांची कामगिरी

बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. तिथे भारताने येथे एकूण 3 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे आणि फक्त 1 जिंकला आहे. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 टी-20 सामनेही खेळले आहेत. प्रोटीज संघाने 2 जिंकले आहेत, तर 1 गमावला आहे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या मैदानावर कधीही भिडले नाहीत. अशा परिस्थितीत, हा देखील एक रंजक योगायोग आहे, कारण या मैदानावर दोन्ही देश थेट T20 वर्ल्ड कप 2024 चा ग्रँड फायनल सामना खेळणार आहेत. विशेष म्हणजे या T20 विश्वचषकात दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत.

बीसीसीआयकडून भारतीय संघाला शुभेच्छा

‘जगातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी तुमची वाटपाहते’ अशा आशयाची पोस्ट करीत भारतीय संघाला (Indian Team) BCCI ने खास शेलीत शुभेच्छा देत आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवला आहे. टी-20 विश्वचषकातील  अत्यंत महत्त्वपूर्ण अंतिम सामना आज बारबाडोसच्या ब्रिजटाऊन केन्सिंग्स्टन मैदानावर (Kensington Oval Bridgetown, Barbados) खेळवला जात आहे.

The liveblog has ended.
  • 29 Jun 2024 11:34 PM (IST)

    29 Jun 2024 11:34 PM (IST)

    भारत बनला विश्वचॅम्पियन

    हार्दिकच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल झाली चुकलेल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात सूर्याद्वारे झेलबाद  झाला.

  • 29 Jun 2024 11:29 PM (IST)

    29 Jun 2024 11:29 PM (IST)

    कॅच नही मॅच पकडलिया

    आज सूर्याने जो कॅच पकडला तो कॅच नाही मॅच होता, हार्दिकवर मॅचचा सर्व खेळ

  • 29 Jun 2024 11:21 PM (IST)

    29 Jun 2024 11:21 PM (IST)

    द. अफ्रिकेला 6 चेंडूत 16 धावांची गरज

    अफ्रिकेच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेत इंडियाने ही मॅच जिवंत ठेवली आहे. त्यानंतर अर्शदीपने अफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवत सामन्याची उत्कंठा वाढवली आहे.

  • 29 Jun 2024 11:18 PM (IST)

    29 Jun 2024 11:18 PM (IST)

    बुमराहने मार्को जान्सनला त्रिफळाचित करीत दाखवला तंबूचा रस्ता

    बुमराहने महत्त्वाची मार्को जान्सनला क्लिन बॉल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर मॅच फिरली आहे. अफ्रिकेला 14 चेंडूत 21 धावांची गरज आहे. आता अर्शदीप गोलंदाजीसाठी आलेला आहे. अर्शदीपला रोहितने महत्त्वाची सजेशन देत  गोलंदाजीचा सल्ला दिला आहे.

  • 29 Jun 2024 11:07 PM (IST)

    29 Jun 2024 11:07 PM (IST)

    हार्दिक पांड्याने विकेट नाही मॅच घेतली

    अक्षरची ओव्हर महागात पडल्यानंतर बुमराहची ओव्हर झाल्यानंतर हार्दिकने हेन्री क्लासेनची विकेट घेऊन अफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे.

  • 29 Jun 2024 09:58 PM (IST)

    29 Jun 2024 09:58 PM (IST)

    बुमराहची कमाल; रिझा हॅड्रीक्सला केले त्रिफळाचित

    बुमराहने दमदार गोलंदाजी करीत रिझा हॅड्रीक्सला त्रिफळाचीत करीत तंबूचा रस्ता दाखवला आहे.

  • 29 Jun 2024 09:44 PM (IST)

    29 Jun 2024 09:44 PM (IST)

    द. अफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य

    विराट आणि अक्षर पटेलने केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने 176 धावांपर्यंत मजल मारली अन् अफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारतीय संघाने मोठे लक्ष्य ठेवले आहे अफ्रिकेच्या फलंदाजांसमोर. आता भारताची कमान बुमराह आणि अर्शदीपच्या गोलंदाजीवर असणार आहे.

  • 29 Jun 2024 09:16 PM (IST)

    29 Jun 2024 09:16 PM (IST)

    लढवय्या अक्षरची विकेट; क्विंटन डी कॉकने मारला थ्रो अन् रनआऊट

    अक्षर पटेल चांगल्या फॉर्ममध्ये असतानाच त्याची विकेट गेल्याने हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. क्विंटन डी कॉकने विकेटच्या पाठीमागून मारलेला थ्रो डायरेक्ट स्टंपला लागून अक्षर रनआऊट झाला.

  • 29 Jun 2024 08:45 PM (IST)

    29 Jun 2024 08:45 PM (IST)

    भारताच्या 10 षटकांमध्ये 3 विकेट गमावून 75 धावा

    अक्षर पटेल आणि विराट कोहलीने खेळपट्टीचा अंदाज घेत संयमी खेळी करीत 75 धावांपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये भारताची धावसंख्या 7.5 च्या रनरेटने चालली आहे. टीम इंडियाला याच रनरेटने खेळणे गरजेचे आहे किंवा त्यापेक्षा अधिक रनरेटने खेळणे गरजेचे आहे.

  • 29 Jun 2024 08:36 PM (IST)

    29 Jun 2024 08:36 PM (IST)

    भारताच्या 8 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 59 धावा

    भारतीय संघाच्या लागोपाठ 2 विकेट गेल्यानंतर सूर्यासुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादात सहज झेलबाद झाला. त्यानंतर अक्षर आणि विराटने संयमी खेळत संघाची धावसंख्या हलती ठेवत टीम इंडिया 60 धावांपर्यंत पोहचली आहे.

  • 29 Jun 2024 08:25 PM (IST)

    29 Jun 2024 08:25 PM (IST)

    रबाडाची रणनीती आणि सूर्याची विकेट

    रबाडाच्या चेंडूवर सीमापार चेंडू मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादव सोपा झेल देऊन बाद झाला. टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 40 धावा केल्या आहेत.

  • 29 Jun 2024 08:17 PM (IST)

    29 Jun 2024 08:17 PM (IST)

    भारताला लागोपाठ दोन झटके, रोहित शर्मानंतर ऋषभ पंत आऊट

    भारताने पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाला लागोपाठ दोन झटके लागले आहेत. कर्णधार रोहित शर्मा स्वीपला शॉट मारण्याच्या नादात एक सोपा झेल देत बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंतसुद्धा एक सोपा झेल देऊन तंबूत परतला.

Web Title: T20 world cup 2024 india vs south africa final match live score at bridgetown kensington ground barbados

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 08:01 PM

Topics:  

  • T20 World Cup 2024
  • World Test Championship

संबंधित बातम्या

IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी
1

IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
2

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक

IND vs ENG : WTC मध्ये Ben Duckett ने रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला इंग्लंडचा पहिला सलामीवीर.. 
3

IND vs ENG : WTC मध्ये Ben Duckett ने रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला इंग्लंडचा पहिला सलामीवीर.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.