Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फास्ट फूडची क्रेज, मॅगी आरोग्याला हानिकारक; तरीही आपण हे चवीनेच खाणार, याचेही आहेत भयंकर परिणाम

नव्या पिढीला फास्ट फूड (fast food) इतके आवडतात की, मुलं घरी तयार केलेला उपमा (upma), चिवडा (chiwda) अथवा आलू-पोहे (aloo-poha) खातच नाही. त्यांना पास्ता(pasta), नूडल्स(nuddles), मॅगी (maggie), पिझ्झा (pizza), सँडविच (sandwich), ब्रेड-पकोडा (bread pakoda) इत्यादी पदार्थ हवे असतात. यासोबतच लिमका(limca), पेप्सी (pepsi) ही थंड पेयेसुद्धा (cold drinks) पाहिजे असतात.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 03, 2021 | 07:45 AM
फास्ट फूडची क्रेज, मॅगी आरोग्याला हानिकारक; तरीही आपण हे चवीनेच खाणार, याचेही आहेत भयंकर परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

मुलांना या पदार्थाची सवय झाल्यामुळे त्यांना हे पदार्थ व पेये खाऊ-पिऊ नये असे सांगणेही कठीण झाले आहे. हे सर्व पदार्थ शरीराला पोषक तर नसतातच उलट ते शरीराला बाधक असतात. या सर्व फास्ट फूडमध्ये कॅलरी असतात परंतु शरीराला पोषक असे काहीही नसते. पूर्वी लोकं मुलांना सकाळी दूध-पोळी, पराठा-चटणी किंवा लोणचे असा नाश्ता द्यायचे. परंतु आता मात्र लहान मुलांपासून युवकांची आवड-निवडच बदलून गेली आहे. चविष्ट पदार्थ खाण्याकडे मुलांचा कल वाढलेला आहे. या पदार्थांमध्ये पोषक तत्व नसतात.

जगप्रसिद्ध कंपनी नेस्लेने सुद्धा मान्य केले आहे की, कंपनी तयार करीत असलेल्या ६० टक्के खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये शरीराला पोषक असे काहीही नसते. या कंपनीची मॅगी आणि नेसकॉफी जगप्रसिद्ध आहे. कंपनीने काही पदार्थांना स्वास्थ्याला पोषक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये कंपनीला यश आले नाही. तथापि कंपनीने त्यांच्या काही खाद्य पदार्थामधील साखर आणि सोडियमची मात्रा कमी केलेली आहे. मागील ७ वर्षामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण १४ ते १५ टक्के कमी केल्याचा दावाही या कंपनीने केला आहे. ही कंपनी दूध, नूडल्स, चॉकलेट, कॉफी इत्यादींची निर्मिती करते.

[read_also content=”निर्बंध नेहमीच जाचक ठरतात : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये कुटुंब नियोजन? धोरणात शिथिलता https://www.navarashtra.com/latest-news/restrictions-are-always-oppressive-in-the-most-populous-china-family-planning-laxity-in-policy-nrvb-136758.html”]

नेस्ले कंपनीच्या अगोदर पेप्सिको आणि मॅकडोनाल्ड या कंपन्यांवर मानवी आरोग्याला हानिकारक पदार्थांची निर्मिती करून ते बाजारात विकत असल्याचा आरोप होता. नेस्लेने आता त्यांच्या मानेसर येथील आर अँन्ड डी सेंटरला स्वास्थ्याला पोषक असे पर्यायी उत्पादन करण्यास सांगितले आहे. आता ही कंपनी पालक आणि गव्हाच्या पीठापासून मॅगी व चॉकलेट तयार करणार आहे. या कंपनीला संतुलित पोषण आहाराकडे लक्ष द्यावे लागणार आहे. साखर आणि मीठाचे जास्त प्रमाण मानवी स्वास्थ्याला हानिकारक असते. ही कंपनी सेरेलॅक, मॅगी नूडल्स, कॅचअप, सूप, पास्ता, मंच, पोलो व नेसकॉफीचे उत्पादन करीत असते.

[read_also content=”पण लक्षात कोण घेतो : तिसऱ्या लाटेची प्रतीक्षा नको; आरोग्य सेवेत आलेली ही शिथिलता करा दूर https://www.navarashtra.com/latest-news/but-who-cares-do-not-wait-for-the-third-wave-get-rid-of-this-laxity-in-health-care-nrvb-136764.html”]

The craze for fast food Maggie detrimental to health Even so owning one is still beyond the reach of the average person

Web Title: The craze for fast food maggie detrimental to health even so owning one is still beyond the reach of the average person nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2021 | 07:40 AM

Topics:  

  • reach

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.