Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत मोबाईल चेक करण्याची सवय सोडायची आहे का ? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

सतत मोबाईल चेक करण्याच्या सवयीचा गंभीर परिणाम मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो. जर तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर या सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलची सवय कमी करु शकता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 02, 2024 | 12:40 PM
सतत मोबाईल चेक करण्याची सवय सोडायची आहे का ? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

सतत मोबाईल चेक करण्याची सवय सोडायची आहे का ? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल मोबाईल ही एक गरज राहिली नसून ते व्यसन झालंय असं अनेकदा म्हटलं जातं. सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम्स यामुळे प्रत्येकाच्या हाताला स्मार्टफोन चिटकलेला असतो त्यामुळे सतत मोबाईल चेक करण्याची सवय अनेकांना असते. मात्र हीच सवय आता व्यसन झाल्याचं दिसत आहे. प्रवासात, ऑफिसमध्ये किंवा घरी असताना  दर मिनिटाला स्मार्टफोनवर येणारं नोटीफिकेशन आणि सोशल मीडियावर अपडेट पाहायण्याची सवय सध्या घातक होत आहे. वारंवार मोबाईल चाळण्याची ही सवय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य विघडविण्याचं काम करत आहे, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुम्हाला ही जर सतत मोबाईल चाळण्याची सवय असेल तर या काही टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या सवयीला नियंत्रणात आणू शकता.

इंटरनेटचा कमी वापर करणं
इंटरनेटच्या माध्यमातून विविध देशातील माणसं एकमेकांशी जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे इंटरनेटमुळे कोणत्याही क्षेत्राची माहिती अगदी कुठेही आणि कधीही मिळवणं शक्य झालं आहे. मात्र कोणत्याही गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त वापर कायम नुकसान करतं. तसंच काहीसं इंटरनेटच्या बाबतीत होताना दिसत आहे. सध्याच्या जगात इंटरनेट जीवनावश्क गरज झाली याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. सतत सोशल मीडियावर येणाऱ्या नोटीफिकेशन्समुळे मानसिक अस्वस्थता वाढते. म्हणूनच ही सवय कमी करण्यासाठी हळूहळू मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा. जेवढी गरज आहे तेवढाच इंटरनेटचा वापर करा. त्यामुळे मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकून राहील.

स्वत:ला इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा
मोकळा वेळ मिळाला की टाइमपास करण्यासाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुमचा मोकळा वेळ योग्य ठिकाणी वापरा. जसं कुटुंबातील माणसं एकत्र येत गप्पा मारणं, मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणं किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावणं यामुळे तुमची मोबाईल वापरण्याची सवय हळूहळू कमी होईल.

नोटीफिकेशन बंद ठेवा
मोबाईलचं वाढत जाणारं व्यसन कमी करण्साठी नोटीफिकेशनला साइलेंट मोडवर ठेवा. त्यामुळे सतत मोबाईलकडे लक्ष जाण्याचा प्रश्न राहत नाही. तुम्ही काम करत असताना किंवा इतर ठिकाणी तुमचा मोकळा वेळ सत्कारणी लावताना मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा. त्यामुळे मोबाईल चेक सवय हळूहळू कमी होईल.

छंद जोपासणं
प्रत्येक व्यक्तीमध्ये असं एखादं कौशल्य असतं जे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. मोकळ्या वेळेत तुम्ही तुमचे छंद जोपासण्याची सवय लावा. गाणी ऐकणं, चित्र काढणं, रांगोळी काढणं यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मोबाईल चेक करण्याची सवय हळूहळू कमी होण्यास मदत होते.

प्रणायाम
मोबाईलच्या जास्त वापराने मानसिक अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना जास्त निर्माण होते. जागतिक पातळीवर नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत असून मोबाईलचा अतिवापर हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळे मानतील अशांतता नष्ट करण्यासाठी आणि मेंदूला स्थिर ठेवण्याकरीता रोज प्रणायाम करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. प्राणायाम केल्याने विचारांवर आणि मनावर नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे सतत मोबाइल पाहण्याची सवय देखील हळूहळू कमी होते

Web Title: The habit of constantly checking mobile can be dangerous follow simple tips to quit this habit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 12:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.