सातारा (Satara). आंबेघर दुर्घटनेतील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरडीमध्ये एकूण 15 जण दबले गेले होते. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचादेखील समावेश होता. एनडीआरएफच्या पथकाकडून कालपासून शोध मोहिम सुरु आहे. या शोध मोहिमतून एकूण 14 मृतदेह सापडले. पण अद्यापही दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडलेला नाही.
[read_also content=”वर्धा/ मित्राची दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात युवक वाहून गेला; व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/the-youth-was-carried-away-in-an-attempt-to-save-a-friend-bike-video-goes-viral-nrat-160851.html”]
एनडीआरएफच्या पथकाने प्रचंड मेहनत घेतली. पण प्रयत्न करुनही अद्यापही बाळ सापडलं नाही. संध्याकाळ झाल्याने अखेर बाळाच्या वडीलांच्या संमतीने एनडीआरएफने शोध मोहिम थांबवली. संबंधित दहा महिन्याच्या मुलीचं नाव हर्षदा धोंडीराम कोळेकर असं आहे.
नेमकं काय घडलं?
रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
आंबेघरमध्ये दुर्घटनेनंतर तब्बल 35 तास उलटल्यानंतरही प्रशासनाची मदत मिळालेली नव्हती. अनेक लोकं मदतीविना होती. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत मदत मिळाली नव्हती. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु होतं. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम पोहोचली नसल्याचं समोर आलं. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं होतं. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं होतं. त्यानंतर काल एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.
तीन भाऊ आणि त्यांचं कुटुंब दबलं
उत्तम कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं आहे. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि पाहुणे असा समावेश आहे. कोळेकर कुटुंबातील मुली पुणे आणि मुंबईला होत्या, त्या काल पाटणमधून चालत आंबेघरमध्ये पोहोचल्या.