Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसरा लॉकडाऊन, वैवाहिक जीवनात धिंगाणा, अनेकांच्या संसाराची झाली माती; कारण काय तर कोरोना

पती-पत्नीच्या वादाचे महत्त्वाचे कारण मोबाइल होते. नोकरी गेली म्हणून पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 10, 2021 | 01:26 PM
दुसरा लॉकडाऊन, वैवाहिक जीवनात धिंगाणा, अनेकांच्या संसाराची झाली माती; कारण काय तर कोरोना
Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे व अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मागील सव्वा वर्षापासून कोरोनाने कहर केला. या कोरोनामुळे घरात पती-पत्नीत वाद होऊ लागल्याने वैवाहिक जीवनात विष कालवले जात आहे.

सन २०२० च्या मार्चपासून आतापर्यंत पोलिसांच्या भरोसा सेलकडे ३७६ तक्रारी आल्या आहेत. सन २०२० मध्ये २९१ तक्रारी, तर सन २०२१ च्या मेपर्यंत ८५ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या. मार्च २०२० पासून १२५ पती-पत्नीचा वाद भरोसा सेलने मिटविला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.

सन २०२० या वर्षात २९१ तक्रारींपैकी १०० प्रकरणांत समेट घडवून आणले. जानेवारी ते मे २०२१ या वर्षातील ८५ तक्रारींपैकी २५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. पती-पत्नीच्या वादाचे महत्त्वाचे कारण मोबाइल होते. नोकरी गेली म्हणून पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो.

[read_also content=”४० वर्षांनंतर डॉक्टरांवर महिलेने केला वैद्यकीय बलात्काराचा आरोप; प्रेग्नन्सीसाठी केलंय इतक्या हीन पातळीचं घाणेरडं आणि भयंकर दुष्कृत्य https://www.navarashtra.com/latest-news/doctors-of-medical-raping-her-says-40-year-old-woman-accuses-nrvb-137366.html”]

यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. महिला किंवा पुरुषांकडून मोबाइलचा अतिवापर किंवा सोशल मीडियावर टाकलेली धूम ही सर्व कारणे पत्नी-पत्नीच्या संसाराला ग्रहण लागत आहेत.

१२५ पती-पत्नींमध्ये समेट घडवून आणण्यात यश

  • गोंदिया जिल्हा भरोसा सेलकडे मार्च २०२० पासून आतापर्यंत सन २०२० मध्ये २९१ तक्रारी, तर सन २०२१ च्या मेपर्यंत ८५ तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या.
  • मार्च २०२० पासून १२५ पती-पत्नींचा वाद भरोसा सेलने मिटविला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.
  • पती-पत्नीच्या वादात भरोसा सेलच्या मध्यस्थीमुळे पती-पत्नीचा वाद मिटला. रडत आलेल्या महिला भरोसा सेलमुळे हसत पतीसोबत घरी परतल्या.

[read_also content=”सूनही कोरोनाबाधित व्हावी म्हणून सासूने रचला असा डाव आणि पुढे जे घडलं ते वाचून तुमचाही तळतळाट होईल https://www.navarashtra.com/latest-news/to-transmit-corona-virus-mother-in-law-hugs-daughter-in-law-nrvb-137021.html”]

मोबाईल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर

पती नोकरीवर जायचा, मुले शाळेत जायची, यामुळे घरात एकटी राहून काम आटोपल्यानंतर टीव्ही व मोबाइल वापरून आपली टाइमपास करणाऱ्या महिलांना मोबाइलचा नाद लागला. कोरोनामुळे पती घरात असल्यावरही त्यांच्या हातून मोबाइल सुटत नसल्यामुळे यातून पती-पत्नीत वाद झाला.

नोकरी गेली म्हणून पैशापेक्षा चारित्र्याचे टेन्शन

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पुरुषवर्ग घरी बसला. कामाच्या नादात बायकोला वेळ न देणारे पुरुष बायकोसोबत तासन्‌तास घालवू लागल्याने काही दिवसांतच पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागले. नोकरी गेल्याच्या टेन्शनपेक्षा चारित्र्याचे टेन्शन अधिक वाढू लागले.

क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून वाद

पती-पत्नी घरातच असल्याने आठवडा त्यांनी गुण्यागोविंदाने काढल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून त्यांच्यात वाद होऊ लागले. परिणामी छोटे वाद घर उद्‌ध्वस्त होण्यापर्यंत पोहोचले. परंतु, भरोसा सेलने अनेक कुटुंब सांभाळली. भरोसा सेलच्या माध्यमातून पती आणि पत्नीचे समुपदेशन करुन त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यात यश आले. काहींची ताटातूट टळली.

व्यसनाधीनतेमुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे, त्यांना मारहाण करणे, क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून भांडण करणे मुला-मुलींच्या परिवारातील सदस्यांचा वाढलेला हस्तक्षेप हा वाद उद्‌भवतो. भरोसा सेलने दोन्ही पक्षातील लोकांना एकत्र बसवून त्यांच्यातील वाद मिटविला.

-उद्धव डमाळे, भरोसा सेल प्रमुख

The second lockdown Dhingana in marital life of many families reason one and only Corona nrvb

Web Title: The second lockdown dhingana in marital life of many families reason one and only corona nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2021 | 01:26 PM

Topics:  

  • reason

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.