मुंबई : राजकुमार राव (rajkumar rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pendnekar) यांच्या आगामी ‘बधाई दो’ या चित्रपटाच टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. ‘बधाई दो'(Badhaai Do) या गाण्याला नकाश अझीझ यांनी स्वरसाज चढवला आहे.
या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला असून, याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. हा चित्रपट समलैंगिकतेवर आधारित असून 11 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जंगली पिक्चर्सच्या ‘बधाई दो’चे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे, तर अक्षत घिलडियाल आणि सुमन अधिकारी यांनी लेखन केल आहे.