Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिसिंग टाइल थेरपी

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते, पण एक प्रयोग म्हणून या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 26, 2023 | 06:00 AM
मिसिंग टाइल थेरपी
Follow Us
Close
Follow Us:

मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतःचे परीक्षण आजवर केलेही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगाद्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. आज त्यांनी केलेला असाच एक प्रयोग तुमच्या समोर मांडत आहे. हा एक सुंदर मेसेज मला पाठवला होता, त्यात खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून आज शेअर करीत आहे.

मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते, पण एक प्रयोग म्हणून या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहून बाजुला काढुन ठेवण्यात आली. आता एक वेगळीच गंमत सुरू झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली, ही टाईल बसवायची राहीली का? का ती बाजुला गळुन पडली? यावर तावातावाने वादविवाद झडू लागले. हॉटेल मालकाच्या या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे, असेही शेकडो जणांनी बोलून दाखवले. एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरुन द्यायचा होता. त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरिअर, तिथले लॅंडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तु याविषयी अगदी थोडक्यात लिहले, आणि मिसिंग टाईलबद्दल अगदी भरभरुन लिहले.

त्या हॉटेलमध्ये जागोजागी, एकाहुन एक देखणी, आकर्षक शिल्पे ठेवण्यात आली होती.), पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या, आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या, मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणूनबुजून ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते की एकूण भिंतीच्या दहा टक्केसुद्धा त्यांचा आकार नव्हता, पण मिसींग टाईलप्रमाणे या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले. लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले. सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहीले याबद्दल आश्चर्य व्यक्त करु लागले. काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या फक्त चुकाच शोधू लागले, एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलिब्रेट करु लागले. शेवटी हॉटेलच्या उदघटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला,   ‘आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसींग टाईल जाणुन बुजुन काढुन ठेवण्यात आली होती’, ‘मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते’, आणि माणसांचे या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणून घ्यायचे होते आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता, हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो,  हजारो गोष्टी मांडुन ठेवण्यात आलेल्या असतानाही, बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, दोष काढुन नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का? नाही.

पण जसजसे आपण मोठे होतो, आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते. मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो, तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमुल्य उर्जा आणि बहुमुल्य वेळ खर्च करतो.

तुमच्या दृष्टीक्षेपात अशी कोणी व्यक्ति आहे का जी सर्वगुण संपन्न आहे किंवा जिच्या आयुष्यात कसलीच कमी नाही? प्रत्येकाच्या जीवनात ‘थोडा है, थोडे की जरूरत है’ असेच आहे. पण ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे, तो आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त काम न करण्याचेच बहाणे शोधतो. आज अशी कितीतरी महान विभूति आपल्यासमोर आहेत ज्यांनी अनेक कष्ट सहन करून, अपयश पचवून पुन्हा पुन्हा उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला. मेहनत केली आणि आपली एक ओळख बनवली. प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्ति ज्यांनी उंच शिखर गाठले ते आपल्या आत्मविश्वासाने, चिकटीने, काबाड कष्टाने. आपण अश्या आदर्श व्यक्तींना नजरे समोर ठेऊन जीवनाच्या ह्या वाटेवर पुढे जावे. उणिवांकडे पाहत बसण्यापेक्षा आपल्या अवती-भवती काय सकारात्मक आहे, याच्याकडे लक्ष केंद्रित केले तर जीवनच बदलून जाईल नाही का?

– नीता बेन

Web Title: There is a famous theory in psychology the missing tiles philosophy missing tile therapy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • article

संबंधित बातम्या

National Ferret Day : गोंडस, चपळ आणि मनमोहक! जाणून घ्या ‘या’ खास प्राण्याबद्दल
1

National Ferret Day : गोंडस, चपळ आणि मनमोहक! जाणून घ्या ‘या’ खास प्राण्याबद्दल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.