Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानगरांच्या धर्तीवर रस्त्याचे काम होणार : महेश शिंदे

सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरातील काम लवकरच सुरु केले जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्‍चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2022 | 02:37 PM
महानगरांच्या धर्तीवर रस्त्याचे काम होणार : महेश शिंदे
Follow Us
Close
Follow Us:

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे कोरेगाव शहरातील काम लवकरच सुरु केले जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्‍चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे. जुना आराखडा आणि डिझाईन बदलण्यात आली आहे. नव्याने एक इंचही जागा बाधित होणार नाही, कोणतीही तोडफोड केली जाणार नाही, त्यासाठी नव्याने वास्तुविशारद नेमण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ अखेर शहर बदलले दिसणार असून, कोरेगावकरांनी टाकलेला विश्‍वास निश्‍चितपणे सार्थ ठरविणार आहे, असा विश्‍वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीची विकासकामे, महामार्गाचे काम आदी विषयांची आढावा बैठक आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, खटाव-माणचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसीलदार अमोल कदम, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक डॉ. शैलेश साठे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदत आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरात नव्याने हाती घेत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

कोरेगावकरांनी नागरिकांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पुसेगावातील रस्त्याचा प्रश्‍न समन्वयाने मार्गी लावला आहे, त्याचधर्तीवर कोरेगावातील प्रश्‍न सोडविला जात आहे. कोरेगावातील रस्त्याची रचना पूर्णपणे बदलली जाणार आहे. महानगरांच्या धर्तीवर विशेषत: पाश्‍चिमात्य देशातील रस्ते ज्या पध्दतीने आकर्षक बनवतात, त्याच पध्दतीने रस्ता बनवला जाणार आहे. जुना आराखडा आणि डिझाईन बदलण्यात आली आहे. नव्याने एक इंचही जागा बाधित होणार नाही, कोणतीही तोडफोड केली जाणार नाही, त्यासाठी नव्याने वास्तुविशारद नेमण्यात आला आहे.

आता भुयारी गटर बांधली जाणार असून, प्रत्येक शंभर मीटरवर एक पाईप टाकून, भविष्यातील नव्या जोडण्यांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. प्रशस्त रस्ता आणि त्यालगत सुमारे अडीच ते पावणे तीन मीटर जागा वापरात आणली जाणार असून, त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात येणार आहेत, असेही आमदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

साखळी पूल विस्तीर्ण होणार; पुढील ५० वर्षांचा विचार करुनच निर्णय घेण्यात आला आहे. साखळी पूल पाडण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. साखळी पूल विस्तीर्ण होणार; पुढील ५० वर्षांचा विचार करुनच निर्णयत्यापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूस मातीचे मजबूत भराव टाकून दुचाकी व हलकी वाहने त्यावर जाऊ शकतील, असा रस्ता बनविण्यात येणार आहे. अवजड व मोठी वाहने यासाठी पर्यायी रस्त्यांचा आराखडा तयार केला जात असून, पोलीस दल आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय त्यावर अभ्यास करुन निर्णय घेणार आहेत.

Web Title: There will be no new obstructions road works will be done on the lines of metropolis says mahesh shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2022 | 02:37 PM

Topics:  

  • Mahesh Shinde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.