
श्रावणात बनवा थंडगार केसर पियुष, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
श्रावण महिना सुरु आहे. या महिन्याला हिंदू धर्मात फार महत्त्व असते. या महिन्याला व्रत-वैकल्याचा महिना म्हणून ओळखले जाते. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. या महिन्यात अनेकजण देवाची पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. आता उपवासाला अनेक गोष्टींचे सेवन करणे वर्ज्य असते. यात स्वीट डिशचे प्रकार फार नाहीत.
अशात तुम्हाला या श्रावणी उपवासात काही गोड बनवून खावेसे वाटत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. महिला वर्ग तर नेहमीच काही ना काही नवीन रेसिपीच्या शोधात असाल अशात केसर पियुष हा पदार्थ तुम्ही फार कमी ऐकला असावा. हा चवीला गोड आणि थंडगार असतो. हे एक स्वादिष्ट मलईदार पेय आहे. उपवासात हा पदार्थ तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करण्यास मदत करेल. तुम्हालाही उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.