सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी टेस्टी आणि चटपटीत खावेसे वाटत असते. त्यातच संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशात अधिकतर आपल्या तळणीचे पदार्थ आठवू लागतात. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की सतत तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अशात तुम्ही टेस्टी पण पौष्टिक अशी रेसिपी ट्राय करू शकता.
तुम्ही हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी मुगाच्या डाळीच्या चाटची हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही चटपटीत आणि पौष्टिक भेळ तुमची संध्याकाळ बहारदार बनवेल. जाणून घ्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सणाची सुरुवात गोडाने करा, घरी बनवा चवदार गाजराची बर्फी, पारंपरिक रेसिपी नोट करा