Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते

आढावा बैठक तिसवा नगरपंचायतीच्या कार्यालयात होणार असं नियोजन होतं. त्याप्रमाणे यशोमती ठाकूर तिथं दाखल झाल्या. मात्र, यावेळी त्यांना नगरपंचायतीच्या कार्यालयातच अस्वच्छता असल्याचं दिसून आलं. “काय हे एवढी घाण? की मी आल्यावर मी साफ करु हे सर्व? तुमच्याकडे दुसरी रुम नसली तरी सर्व पसारा एका कोपऱ्यात राहू शकतो. एवढ्या घाणीत तुम्ही बसुच कसे शकता? तुमचं कार्यालयच एवढ घाण असेल तर डेंग्युचे पेशंट वाढणारचं.” असं म्हणत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 01, 2021 | 08:22 AM
तिवसा नगरपंचायतीने बांधली तब्बल ७२ लाखांची कंपाउंड वॉल, पालकमंत्री म्हणतात अरे एवढ्या पैशात तर अर्धी इमारत बांधून होते
Follow Us
Close
Follow Us:

अमरवाती Amravati जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर Minister Yashomati Thakur यांच्याकडे तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी, सफाईकामांत नियमितता नसल्याच्या तक्रारी, पीण्याचा गढुळ पाण्याच्या तक्रारी सतत येत होत्या. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या तक्रारींची दखल घेत नगरपंचायतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना तिवसा नगरपंचायतीने Tivasa Nagar Panchayat तब्बल ७२ लाख रुपये कंपाउंड वॉल बांधण्यासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले.

नगरपंचायतच अस्वच्छ

आढावा बैठक तिसवा नगरपंचायतीच्या कार्यालयात होणार असं नियोजन होतं. त्याप्रमाणे यशोमती ठाकूर तिथं दाखल झाल्या. मात्र, यावेळी त्यांना नगरपंचायतीच्या कार्यालयातच अस्वच्छता असल्याचं दिसून आलं. “काय हे एवढी घाण? की मी आल्यावर मी साफ करु हे सर्व? तुमच्याकडे दुसरी रुम नसली तरी सर्व पसारा एका कोपऱ्यात राहू शकतो. एवढ्या घाणीत तुम्ही बसुच कसे शकता? तुमचं कार्यालयच एवढ घाण असेल तर डेंग्युचे पेशंट वाढणारचं.” असं म्हणत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.

७२ लाखांची कंपाउंड वॉल

स्वच्छतेसाठी केलेल्या खर्चाचा आढावा घेताना यशोमती ठाकूर यांना नगरपंचायतीने तब्बल ७२ लाख रुपये कंपाउंड वॉल बांधण्यासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी “७२ लाखांत तर अर्धी इमारत होते. पुढच्या वर्षी आजून थोडा निधी दिला असता तर पुर्ण बिल्डींगच बनवून झाली असती. अरे स्वत:चं घर चालवता तसं चालवा की. आपण घरात बचत करतो ना? एक महिन्यांत एवढे पैसे का वाया घालवले? एक महिनाभर तुम्ही काय केलंत ऐश?” असं म्हणत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

“हिंमत असेल तर हे पाणी प्या” यशोमती ठाकूर यांचे मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना आव्हान

पीण्याचे पाणी खराब येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली केली होती. त्याचा आढावा घेताना त्या म्हणाल्या की, “एवढे पैसे तुमच्याकडे आहेत मग तुम्ही पाण्याला का नाही दिलं? हे घ्या हे पाणी प्या तुम्ही.. एवढ गढूळ पाणी तुम्ही नाही पीणार मग या लोकांनी का प्यायंच?”

पाणी सुध्द करण्याची यंत्रणाच नाही

पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्याधिकारी पल्लवी सोटे म्हणाल्या की, “मॅडम आपल्याकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणाच अस्तीत्वात नाही. आणि हि यंत्रणा मी कशी टाकू शकणार?”

मुख्याधिकाऱ्यांच्या या उत्तरावर पालकमंत्री चांगल्याच भडकल्या व त्यांनी “म्हणजे तु दुधाने धुलेली आहेस. ७२ लाख रुपये नको त्या गोष्टीवर खर्च करता तुम्ही त्या ठिकाणी ७२ लाखांत काहीच झालं नसतं?”  असं म्हणत मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना चांगलंच फैलावर घेतलं.

जनतेच्या जिवाशी खेळू नका

तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला.

Tivasa Nagar Panchayat built a compound wall worth Rs. 72 lakhs Minister Yashomati Thakur got angry

Web Title: Tivasa nagar panchayat built a compound wall worth rs 72 lakhs minister yashomati thakur got angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2021 | 08:12 AM

Topics:  

  • Adv. Yashomati Thakur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.