तुमच्या फोनमध्ये करा ही लहान Settings, चुकूनही येणार नाही Spam Calls
स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अशात आपल्या प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी आपण याचा वापर करतो. याच गोष्टीकडे बघता घोटाळेबाज दररोज आपल्या मोबाईलवर पुष्कळ फेक कॉल्स करत असतात. करोडो मोबाईल युजर्ससाठी स्पॅम कॉल ही सर्वात मोठी डोकेदुखी बनली आहे. तुमच्याही फोनवर दररोज कोणत्या ना कोणत्या नंबरवरून फेक कॉल येत असतील. दरवर्षी या बनावट कॉलद्वारे घोटाळेबाज कोट्यवधी रुपयांची फसवणूक करतात. फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी सरकारने नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत, पण फेक कॉल्स मिळण्याचा ट्रेंड थांबत नाहीये.
लाखो प्रयत्न करूनही युजर्सच्या नंबरवर काही स्पॅम कॉल येत आहेत. स्पॅम कॉलला आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक आणि दूरसंचार विभाग यांनी यापूर्वी अनेक कठोर कारवाई केली आहे. दूरसंचार कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Android युजर्स त्यांच्या फोनवर स्पॅम कॉल ब्लॉक करू शकतात. यासाठी त्यांना त्यांच्या फोनमध्ये फक्त एक लहान सेटिंग करावी लागेल. तुम्हीही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर आम्ही तुम्हाला अशा सेटिंगबद्दल सांगत आहोत, जि ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर स्पॅम कॉल्स येणं बंद होईल. चला तर मग ही सेटिंग कशी ऑन करायची याबाबत स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
फोन ऑन असतानाही कॉलरला Switch Off ऐकू येईल, खूप कामाची ही ट्रिक
फोनमध्ये त्वरित करा या सेटिंग्ज