येत्या काळात बीएसएनएलचा युजर बेस फार वाढला आहे. ज्यामुळे कंपनी आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन योजना घेऊन येण्याच्या विचारात आहे. त्यातच आता बीएसएनएल लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, कंपनी आपल्या युजर्ससाठी eSim सुविधा सादर करणार आहे. असे केल्याने कंपनी थेट जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करेल. दोन्ही प्रमुख दूरसंचार कंपन्या eSIM सेवा देतात. ही प्रगती युजर्सना BSNL सुसंगत स्मार्टफोनमध्ये eSIM वापरण्याची परवानगी देईल. ही माहिती नुकतीच AskBSNL सत्रादरम्यान BSNL बोर्डाच्या मुख्य संचालकांनी शेअर केली.
युजर्सना केव्हा मिळणार eSim सर्व्हिस?
eSim सर्व्हिस केव्हा उपलब्ध होईल? याला उत्तर देताना बोर्डाचे सीएम संचालक म्हणाले की, सरकारी दूरसंचार ऑपरेटर यावर सतत काम करत आहेत. हे फीचर पुढील वर्षी मार्चमध्ये ग्राहकांसाठी लाँच केले जाऊ शकते.
फोन ऑन असतानाही कॉलरला Switch Off ऐकू येईल, खूप कामाची ही ट्रिक
मागील काही काळापासून बीएसएनएलचा बोलबाला वाढला
बीएसएनएलसाठी गेले चार महिने चांगले गेले. या महिन्यांत, 5.5 दशलक्ष म्हणजेच 55 लाख नवीन ग्राहक कंपनीत सामील झाले आहेत. दरवाढीमुळे बीएसएनएलला चांगला फायदा झाला आहे. कंपनीत सामील झालेले बहुतेक नवीन ग्राहक हे आहेत जे पूर्वी एअरटेल किंवा जिओच्या सर्व्हिस वापरत होते.
लाँच झाली नवीन सर्व्हिस
अलीकडे, बीएसएनएलने युजर्सना चांगली सर्व्हिस देण्यासाठी अनेक नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने एआय-आधारित स्पॅम कॉल आयडेंटिफिकेशन फीचर, वाय-फाय रोमिंग आणि ओटीए सिम सारख्या अनेक सर्व्हिस लाँच केल्या होत्या.
4G टॉवर लावण्याचे लक्ष
याशिवाय, सरकारी कंपनी आपले स्ट्रक्चर सतत मजबूत करत आहे. 2025 च्या मध्यापर्यंत 100,000 4G टॉवर्स बसवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. लेटेस्ट रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की कंपनी 4G टॉवर लावल्यानंतर कंपनीची 5G रोलआउट करण्याची तयारी सुरू करेल. सध्या कंपनी काही निवडक भागात 5G सर्व्हिसची टेस्टिंग करत आहे.
येत्या काही वर्षांत BSNL चे 5G नेटवर्क देशभरात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सरकारच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत. BSNL ने C-DoT च्या सहकार्याने कोर 4G प्रणाली तयार केली आहे. कंपनीने तेजस नेटवर्क्स RAN आणि QBTS सारख्या इनोव्हेशनसह एकत्र काम केले आहे.