Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज वसुबारस; अशी आहे वसुबारसेची कथा; जाणून घ्या महत्त्व

निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. यादिवशी गहू, मूग खात नाहीत.

  • By Nitish Gadge
Updated On: Nov 12, 2020 | 07:40 AM
Today Vasubaras this is the story of Vasubaras

Today Vasubaras this is the story of Vasubaras

Follow Us
Follow Us:

दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून. दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो. नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीन एन्जॉय करीत असतो.

आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.

निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. यादिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून. दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो. नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करीत असतो.

आटपाट नगर होते. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरे होती. ढोरे म्हशी होत्या. गव्हाळी, मुगाळी वासरे होती. एके दिवशी काय झाल? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये ! सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे, मुगांचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले. आपण शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली.

गहू मूग काढून ठेवले. खाली आली, गोठ्यांत गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पहात बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशीं जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा करा. गाईवासरे जिवंत करा.

असे न होईल तर संध्याकाळीं मीं आपला प्राण देईन, असा निश्चय केला. देवापाशीं बसून राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. निष्कपट अंतकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळीं गाई आल्या. हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवान काय केले? गाईची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गाईंचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटले. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गाईगोर्‍ह्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले.

दिवाळीत गो-पूजेचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या  विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता ‘सर्वभूतहिते’ हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे.

नियम व विधी

या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

‘गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभि: सत्यवादिभि:।
अलुब्धै: दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही:।।’

‘गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे. ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले, त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल. म्हणून गाईला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल. मानवेतर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गो-पूजेतून सांगितले जाते. मोहम्मद पैंगंबर यांनीही कुराणातून गाईच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गो-पूजा करावी असे सांगितले आहे.

असा साजरा करावा हा सण

ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी.गायीच्या पायावर पाणी टाकावे.गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अश्या रीतीने पूजा करावी.निरांजनाने ओवाळून घ्यावे.गायीच्या अंगाला स्पर्श करावे.गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.

या दिवसाचे काही नियम

स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.ह्या दिवशी गहू, मूग खात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुला-बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख-समृद्धीसाठी ही पूजा करतात.

Web Title: Today vasubaras this is the story of vasubaras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2020 | 01:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.