
फोटो सौजन्य- iStock
एनटीए कडून आज दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे.
21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून एटीएच्या नोटिसनुसार या परीक्षेची सिटी स्लिप या अगोदरच जारी करण्यात आली होती. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे त्यांनी त्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख अशी लॉगिन क्रेडेंशियल सादर करायचे आहे.
अडचण अथवा तक्रारीसाठी
जर कोणत्या उमेदवारास प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास अथवा प्रवेशपत्रामध्ये कोणतीही तफावत असल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराने 011-40759000 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ugcnet@nta.ac.in या इमेल आयडीवर मेल करु शकतात.
यूजीसी नेट प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ( UGC NET Admit Card 2024)
सर्वप्रथम तुमचा अर्ज फॉर्म तुमच्यासोबत ठेवा
युजीसी नेट च्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर UGC NET प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
आपले लॉगिन क्रेडेंशियल भरा आणि सबमिट करा.
तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा
या प्रवेशपत्राची प्रिंट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.
UGC NET परीक्षा
दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी नेट परीक्षेसाठी उपस्थित राहतात. भारतातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यपक पद मिळवण्यासाठी अनके परीक्षार्थी या परीक्षेची तयारी करतात. विशेष म्हणजे या वर्षीपासून पीएचडीचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश परीक्षा म्हणून युजीसी नेट परीक्षेला मान्यता दिली गेली आहे. युजीसी नेट परीक्षा ही वर्षांतून दोनदा आयोजित केली जाते. शिक्षण क्षेत्रात करिअर बनवू इच्छित असणाऱ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची असते. मागील जून महिन्यातील परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली होती. आता ऑगस्टमध्ये एनटीएकडून त्याचे आयोजन केले गेले आहे.