Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेमडेसिवीरचा वापर कधी आणि किती कराल ? जाणून घ्या काय आहे या इंजेक्शनचा उपयोग

रेमडेसिवीर(remdesivir injection) आरडीआरपीवर थेट हल्‍ला करत काम करते. रेमडेसिवीर आवश्‍यक असलेल्‍या ‘फिडिंग’ची गरज पूर्ण करते, ज्यामुळे विषाणूचे प्रमाण अधिक वाढण्‍याला प्रतिबंध होतो.

  • By साधना
Updated On: Apr 22, 2021 | 06:52 PM
रेमडेसिवीरचा वापर कधी आणि किती कराल ? जाणून घ्या काय आहे या इंजेक्शनचा उपयोग
Follow Us
Close
Follow Us:

कोरोना साथीच्‍या (corona)रोगादरम्‍यान नियंत्रित धोरणांनंतरदेखील वाढलेल्‍या प्रादुर्भावाला रिपर्पज्ड औषधे ही त्‍वरित प्रतिसाद आहेत. ही औषधे वेळेची बचत करण्‍यासोबत प्री-क्लिनिकल आणि अर्ली क्लिनिकल चाचणीमध्‍ये सुरक्षित असल्‍याचे सिद्ध झाले आहे.

ही औषधे थेट आजाराचा अंतिम टप्‍पा, म्‍हणजेच तिसऱ्या टप्‍प्‍यामध्‍ये वापरता येऊ शकतात आणि कोविड-१९ वर उपचार म्‍हणून त्‍यांची सुरक्षितता व कार्यक्षमतेसाठी सुलभपणे त्‍यांचे मूल्‍यांकन करता येऊ शकते. हीच गोष्‍ट रेमडेसिवीरसारख्‍या औषधांच्‍या बाबतीत करण्‍यात आली आहे. लक्षणे दिसून न येणाऱ्या किंवा सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ संसर्गाची लागण असलेल्‍या रूग्‍णांना रेमडेसिवीर देण्‍यात आले आहे.

रेमडेसिवीर कसे काम करते ?

विषाणूने मानवी पेशीमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर पेशी जेनेटिक घटक उत्‍सर्जित होतात, जे शरीराच्‍या विद्यमान यंत्रणेचा वापर करून शरीरभर पसरतात. संसर्गाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर विविध मानवी प्रोटीन्‍स, विषाणू प्रोटीन्‍स आणि त्‍यांची परस्‍परक्रिया होत असते. पुनरावृत्तीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये आरडीआरपी नावाचे प्रमुख व्‍हायरल प्रोटीन विषाणूचा स्रोत बनते. रेमडेसिवीर आरडीआरपीवर थेट हल्‍ला करत काम करते. रेमडेसिवीर(remdesivir injection use) आवश्‍यक असलेल्‍या ‘फिडिंग’ची गरज पूर्ण करते, ज्यामुळे विषाणूचे प्रमाण अधिक वाढण्‍याला प्रतिबंध होतो.

रेमडेसिवीरचा वापर करण्‍याची योग्‍य वेळ कोणती ?

सार्स-कोव्‍ह-२ विषाणूवरील उपचारासाठी यूएसएफडीएने प्रथम रेमडेसीवरला मान्‍यता दिली. हे औषध कोविड-१९ च्‍या गंभीर व महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यांदरम्‍यान प्रभावी ठरले. तसेच हे औषध हेपेटोटॉक्सिक असण्‍यासोबत यकृत पेशींना हानिकारक असल्‍याचे देखील आढळून आले. व्‍यावहारिकदृष्‍ट्या व्‍हायरलची पुनरावृत्ती पहिल्‍या १ ते ७ दिवसांमध्‍ये समाप्‍त होते. साधारण ७ ते ८ दिवसांनंतर गंभीर कोविड-१९ आजारासंदर्भात दिसण्‍यात आलेली जटिलता दाहक प्रतिक्रियेमुळे (एसआयआरएस) आहे. त्यामुळे सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये, म्‍हणजेच व्‍हायरल पुनरावृत्ती होत असलेल्‍या दुसऱ्या ते दहाव्‍या दिवसांदरम्‍यान या औषधाचा वापर करावा. ज्‍यामुळे शरीरातील विषाणूचा प्रभाव कमी होईल.

रेमडेसिवीरबाबत माहित असावी अशी महत्त्वपूर्ण बाब

डब्‍ल्‍यूएचओच्‍या संशोधनानुसार रेमडेसिवीर रूग्‍णांमधील मृत्‍यूंच्‍या प्रमाणात प्रतिबंध करत नाही किंवा हॉस्पिटलमधील उपचाराचा कालावधी लक्षणीयरित्‍या कमी करत नाही. गंभीर आजारी असलेल्‍या किंवा मल्‍टी–ऑर्गन डायस्‍फंक्‍शनपासून पीडित असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये या औषधाचा वापर करू नये. पण, सौम्‍य ते मध्‍यम संसर्ग असलेल्‍या आणि लक्षणे दिसून न येणाऱ्या रूग्‍णांमध्‍ये त्‍याची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी संसर्गाच्‍या दुसऱ्या व दहाव्‍या दिवसादरम्‍यान या औषधाचा वापर करावा.

साथीच्‍या रोगादरम्‍यान रेमडेसीवरच्या परिणामकारकतेला महत्त्व मिळाले असले तरी या औषधाच्‍या तुटवड्यामुळे हेल्‍थकेअर प्रदाते, पुरवठादार व रूग्‍णांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तुटवड्यामागे अनेक कारणे आहेत – कोविड-१९ केसेसमध्‍ये वाढ, अनावश्‍यक स्‍टॉ‍कपिलिंग आणि गंभीर संसर्ग असलेल्या रूग्‍णांसाठी औषधाचा वापर. पण, दुसऱ्या लाटेचा भयंकर परिणाम दिसून येत असताना सरकारने स्‍थानिक पातळीवर हे औषध मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होण्‍यासाठी त्‍याच्‍या निर्यातीवर बंदी घातली आहे.

रेमडेसिवीरचा वापर करण्‍याची योग्‍य पद्धत

औषधाला अधिक मागणी असली तरी त्‍याचा योग्‍यप्रकारे वापर करणे माहित असलेच पाहिजे. या कोर्समध्‍ये सामान्‍यत: ५ दिवसांमध्‍ये ६ डोसेस दिले जातात (पहिल्‍या दिवशी २०० मिलीग्रॅम, त्‍यानंतर पुढील ४ दिवस १०० मिलीग्रॅम). या औषधाचा अधिक प्रमाणात वापर करू नये. गंभीर संसर्ग असलेल्‍या रूग्‍णांना हे औषध प्रीस्‍क्राइब केले जात नाही आणि औषध प्रीस्‍क्राइब करण्‍यापूर्वी रूग्‍णाची सखोल तपासणी केली जाते. हे औषध संसर्गाच्‍या दहाव्या दिवसानंतर प्रिस्‍क्राइब केले जात नाही.

आपल्‍याला समजलेच असले की गरज असलेल्‍या अनेक रूग्‍णांना वेळेवर हे औषध मिळत नाही आहे. एक समुदाय म्‍हणून आपण जबाबदारीने वागलो पाहिजे आणि या औषधाचा योग्‍य वापर व पुरवठ्याची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग, यामध्‍ये परिवर्तन घडवून आणूया आणि अधिकाधिक लोक लवकर बरे होण्‍याची खात्री घेण्‍यासोबत कार्यक्षमपणे या लढ्याचा सामना करूया.

Web Title: When can you use remdesivir injection and what is the use know more nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2021 | 06:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.