Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून समोर आले ‘हे’ खुलासे

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या पॉर्न (porn) पाहण्याच्या सवयीबाबत एक अभ्यास (study) केला आहे. हा अभ्यास Psychology of Addictive Behaviors या नियतकालिकात प्रसिद्ध झालाय. यामध्ये त्यांनी पॉर्न पाहण्याची नेमकी कारणं काय आहेत ? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 28, 2021 | 12:28 PM
लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून समोर आले ‘हे’ खुलासे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : इंटरनेच्या महाजालामुळे तळहाताएवढ्या मोबाईलमध्ये संपूर्ण जग सामावले आहे. मोबाईल तसेच कंप्युटरच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. यामध्ये विशेष सांगायचे झाले तर इंटरनेटमुळे लोकांना पॉर्नसुद्धा अगदी सहज उपलब्ध झालेय. सध्या लोकांमध्ये पॉर्न (Porn) पाहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. याच गोष्टीचा विचार करुन पॉर्न पाहण्याचे कारण काय ? तसेच त्याचे प्रमाण किती ? याविषयी संशोधक Bothe आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभ्यास केला आहे. याच अभ्यासातून पॉर्न पाहण्यासंबंधी एक नवी माहिती समोर आली आहे.

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीबाबत एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास Psychology of Addictive Behaviors या नियतकालिकात प्रसिद्ध झालाय. यामध्ये त्यांनी पॉर्न पाहण्याची नेमकी कारणं काय आहेत ? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

[read_also content=”कोरोनामुळे १२ टक्के अधिक मृत्यू, न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल धादांत खोटा; असा चुकीचा अहवाल प्रतिष्ठित वृत्तपत्रात छापायला नको होता https://www.navarashtra.com/latest-news/on-new-york-times-narendra-modi-government-report-niti-ayog-on-corona-deaths-in-india-nrvb-134753.html”]

अभ्यास नेमका कसा केला ?

पॉर्नविषयी संशोधन करण्यासाठी Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हंगेरी देशातील लोकांचे तीन गट तयार केले. यामध्ये पहिल्या सॅम्पलमध्ये एकूण ७७२ लोकांची चौकशी करण्यात आली. यामध्ये ५१ टक्के महिला होत्या. तसेच दुसऱ्या सॅम्पलमध्ये ७९२ लोकांकडून माहिती विचारली गेली. यामध्ये एकूण ६ टक्के महिला होत्या. या सॅम्पलमधील लोक पॉर्न आठवड्यातून दोन वेळा पाहत होते. तर तिसऱ्या सॅम्पलमध्ये एकूण १०८२ लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सरासरी लोकांचे वय २४ वर्षे होते.

लैंगिक सुखासाठी ४५ टक्के लोक पॉर्न पाहतात

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे ज्या आठ कारणांचा आधार घेतला आहे, त्या विषयीची आकडेवारी मोठी रंजक आहे. पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये जवळपास ४५.२ टक्के लोक हे लैंगिक सुख मिळावे म्हणून पॉर्न पहतात. तर लैंगिकतेबद्दलची उत्सुकता म्हणून १२.३ टक्के लोकांनी पॉर्न पाहिले आहे. तसेच कल्पनाविलासापोटी जवळपास ९ टक्के लोक पॉर्न पाहणे पसंद करतात.

[read_also content=”फणसाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर तितक्याच धोकादायकही; डायबेटीससाठी खाणार असाल तर एकदा हे वाचाच https://www.navarashtra.com/latest-news/jackfruit-seeds-are-equally-dangerous-for-health-nrvb-134744.html”]

समाधानकारक लैंगिक सुख न मिळणे हेसुद्धा एक कारण

लैंगिकता, संभोग, पॉर्न तसेच इतर गोष्टींविषयीची माहिती करुन घेण्यासाठी (self-exploration) काही लोक पॉर्न पाहणे पसंद करतात. ही आकडेवारी ६.६ टक्के आहे. तसेच समाधानकर लैंगिक सुख न मिळाल्यामुळेही लोक पॉर्नकडे वळत असल्याचे समोर आले आहे. त्याचे प्रमाण ५.९ टक्के आहे. आलेला कंटाळा, थकवा दूर व्हावा म्हणून अभ्यास केलेल्या लोकांपैकी चार टक्के लोकांना पॉर्न पाहणे आवडत असल्याचे समोर आले आहे. भावनिक दडपण आल्यामुळे २.२ टक्के लोक पॉर्न पाहतात. तसेच तणाव कमी व्हावा म्हणूनसुद्धा २.१ टक्के लोक पॉर्नकडे वळतात. या सर्व कारणांनंतर पॉर्न पाहण्याची इतरही काही कारणे आहेत. ज्याचे प्रमाण ७.३ टक्के आहे.

दरम्यान, संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लैंगिक सुख, लैंगिकतेविषयी असलेली जिज्ञासा आणि काल्पनिक जगामध्ये रमण्यासाठी लोकांना पॉर्न पाहणे जास्त प्रमाणात आवडते असे या अभ्यासातून समोर आले आहे.

Why do people watch porn What is the reason Big revelations proportion from a new study of porn viewing

Web Title: Why do people watch porn what is the reason big revelations proportion from a new study of porn viewing nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 12:28 PM

Topics:  

  • people
  • reason

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.