Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या लसीकरणाला का होतोय उशीर? आत्ताही लसीकरण सुरु केले तरी एका वर्षात केवळ २५ टक्के मुलांचेच लसीकरण शक्य

मोठ्यांना देण्यात येत असलेली कोव्हॅक्स्न लसच लहान मुलांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीच्या सूत्रांनुसार, मोठ्यांना देण्यात येणारी लस ५२५ मुलांना चाचणीत देण्यात आली होती, २८ दिवसांत या लसीचे दोन डोस देण्यात आले. चाचणीचा अंतिम अहवाल ऑक्टोबरमध्ये सरकारला सुपूर्त करण्यात आला आहे. चाचणीत मोठ्यांची लस लहान मुलांवर परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 06, 2021 | 11:01 AM
लहान मुलांच्या लसीकरणाला का होतोय उशीर? आत्ताही लसीकरण सुरु केले तरी एका वर्षात केवळ २५ टक्के मुलांचेच लसीकरण शक्य
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली- कोरोनाची तिसरी लाट तोंडावर सल्याची चर्चा सुरु आहे. अनेक देशांना पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसतो आहे. देशात लसीकरणाची आकडेवारी १०० कोटींवर पोहचली असली, तरी अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाचं का, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ऑग्सटमध्ये कॅडिलाच्या डायकोव-डी या लशीला मुलांसाठी मंजुरी मिळाली होती. मात्र आजही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस उपलब्ध नाही. तसचं कोव्हॅक्सिनलाही विषय तज्ज्ञ समितीने आपतकालीन वापरास मंजुरी दिली असली तरी अद्याप ड्र्गज जनरल कंट्रोलर ऑफ इंडियाची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे.

मुलांसाठी कोणकोणत्या लशींना परवानगी

सरकारने कँडिलाच्या जायकोव-डी लशीला लहान मुलांसाठी परवानगी दिली आहे. ही लस १२ वर्षांवरील सर्वांसाठी उपयुक्त आहे. ऑगस्टमध्ये परवानगी मिळाली असली तरी अद्याप लस उपलब्ध नाही. कंपनी या लशीची किंमत १९०० रुपये ठेवण्याच्या तयारीत आहे, त्याला सरकारचा विरोध आहे. कमी किमतीत लस उपलब्ध व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या लसीच्या तिसऱ्या चाचणीचा निष्कर्षही अद्याप बाकी आहे, तसेच लशींची उपलब्धता हेही एक कारण आहे. कंपनीने एका महिन्याला १ कोटी लशी पलब्ध करुन देण्याची खात्री दिली आहे. मात्र ही संख्या अपुरी आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशात सुमारे ३० कोटी लहानग्यांना लशींची आवश्यता आहे.

तर कोव्हॅक्सिनलाही मुलांसाठी आपतकालीन वापरास मंजरी मिळालेली आहे. मात्र अजून एका विभागाची मंजुरी बाकी आहे. २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देता येणार आहे. कोव्हॅक्सीनच्या लशींची उपलब्धता हाही मुद्दा आहे. आत्तापर्यंत कोव्हॅक्सिनने उत्पदानाचे जे आश्वासन दिले होते, ते ती पूर्ण करु शकलेली नाही. सप्टेंबरपर्यंत कंपनी ३.५ कोटी लसींचे उत्पादन करते आहे, मात्र आश्वासन ५.५ कोटींचे दिले होते. सुप्रीम कोर्टातही कोव्हॅक्सीनने सुरुवातील दरमहा १० कोटी आणि नंतर ८ कोटी उत्पादन करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कंपनी ते पूर्म करु शकलेली नाही. कच्च्या मालाचा तुटवडा आणि साठवणूक क्षमतेचा अभाव अशी कारणे पुढे करण्यात येत आहेत.

मुलांना देण्याच येणारे कोव्हॅक्सिन मोठ्यांपेक्षा वेगळी असेल ?

मोठ्यांना देण्यात येत असलेली कोव्हॅक्स्न लसच लहान मुलांना देण्यात येईल, अशी शक्यता आहे. भारत बायोटेक कंपनीच्या सूत्रांनुसार, मोठ्यांना देण्यात येणारी लस ५२५ मुलांना चाचणीत देण्यात आली होती, २८ दिवसांत या लसीचे दोन डोस देण्यात आले. चाचणीचा अंतिम अहवाल ऑक्टोबरमध्ये सरकारला सुपूर्त करण्यात आला आहे. चाचणीत मोठ्यांची लस लहान मुलांवर परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिसेंबर २०२२ पर्यंत मुलांचे लसीकरण शक्य ?

मंजुरी मिळालेल्या जायकोव डीचे तीन डोस मुलांना द्यावे लागणार आहेत. वर्षभरात कंपनीने २४ कोटी लशींचे उत्पादन केले तरी वर्षभरात केवळ ८ कोटी मुलांचे लसीकरण होईल. तसाच विचार कोव्हॅक्सिनचा केला तर एका वर्षात १६ कोटी लशींची निर्मिती होईल, त्यातून ८ कोटी मुलांचे लसीकरण होईल. दोन्ही कंपन्यांच्या लसींचा विचार केला तर वर्षभरात केवळ १६ कोटी मुलांचे लसीकरण शक्य होणार आहे.

देशाच्या लोकसंख्येत ४० टक्के लोकसंख्या ही १८ वर्षांखालील आहे. म्हणजेच ५५ ते ६० कोटी मुलांच्या लोकसंख्येत १६ कोटी जणांचे लसीकरण म्हणजे केवळ २५ टक्केच मुलांचे लसीकरण वर्षभरात शक्य आहे.

कधी सुरु होणार मुलांचे लसीकरण ?

नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मुलांचे लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.  आजारी असलेल्या मुलांचे पहिल्यांदां लसीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे, मात्र त्यासाठी डॉक्टरांच्या रिपोर्टसची गरज लागेल. यावर लवकरच निर्णय़ होणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत ज्याही देशांत मुलांचे लसीकरण झाले आहे, तिथे मुलांवर कोणतेही गंभीर परिणाम झालेले नाहीत. मोठ्यांप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे साईड इफेक्ट लस दिल्यानंतर मुलांना होण्याची शक्यता आहे.

Web Title: Why is it so late to vaccinate children even if vaccination is started now only 25 of children can be vaccinated in a year nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2021 | 10:46 AM

Topics:  

  • Corona Vaccination

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.