कल्याण: कल्याणमध्ये (Kalyan) एका पत्नीनं पतीचं सिक्रेट पोलिसांना सांगितलं.त्यामुळे पतीला फरार व्हाव लागलं. घरात कोरे वोटर (Blank Voter ID) आयडीकार्ड पडलेले होते. ते पती घेऊन जाणार होता. पण त्याआधीच पत्नीनं ही माहिती पोलीस (Police) आणि तहसिलदारांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करत या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या पती-पत्नीची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
[read_also content=”१ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी ,महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेची नवाब मलिक यांनी केली घोषणा,अधिक माहिती जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/nawab-malik-declared-maharashtra-apprenticeship-promotion-scheme-for-youth-in-state-nrsr-137452.html”]
कल्याण पश्चिमेतील माधव संसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या कामेश मोरे आणि कृतिका मोरे या पती पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. त्याच्या घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू आहे. या दरम्यान एकदिवस कामेश मोरे यानं मुलाला फोन करून त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र काढून ठेवायला सांगितलं. काही वेळानं कामेश ते घेऊन जाणार होता. मुलानं काढलेले ते मतदान ओळखपत्र पाहून पत्नीला धक्काच बसला. त्याचं कारण म्हणजे ते सर्व वोटर कार्ड हे कोरे होते. पती नक्की काहीतरी चुकीचं करत असल्याची जाणीव कृतिका यांना झाली.
[poll id=”50″]
कृतिका यांनी खडकपाडा पोलीस आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना फोन केला. घरात मोठ्या संख्येनं कोरे वोटर आयडी कार्ड असल्याचं कळताच नायब तहसीलदार वर्षा थळकर टीम तिथं पोहोचल्या. एवढे सारे कोरे मतदान ओळखपत्रं पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. कोऱ्या कार्डसह काही दुसऱ्या तालुक्याचे कार्डही होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत ते जप्त केले. या प्रकारानंतर कामेश मोरे फरार असल्याचं समोर आलं आहे.
हाय प्रोफाईल सोसायटीचत राहणाऱ्या व्यक्तीनं कोरे वोटर आयडी कुठून आणि कशासाठी आणले. त्याचा कोणाला फायदा होणार आहे. या कृत्यात कामेश मोरे सोबत कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर कामेश मोरे याच्या अटकेनंतर समोर येणार आहे. खडकापाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.