कल्याणमध्ये नोकरी व संपत्तीच्या वादातून सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हत्येनंतर मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला असून दोन्ही आरोपी अटकेत आहेत.
सायकलिस्टबद्दल आदर आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश घेत 18 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकलप्रवास सुरु केला आहे. गेल्या 7 वर्षांपासून हे कल्याणातील सायकलस्वार सामाजिक संदेश घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.
कल्याणमध्ये एका भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असतानाच केडीएमसीतील मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे
कल्याणमध्ये टोपीवरून झालेला किरकोळ वाद हिंसक वळणावर गेला. शेजाऱ्यांनी गरोदर महिलेवर हल्ला केला. आरोपीने पोटात लाथ मारल्याने गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. चार जणांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे.
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचे हे प्रदर्शन ठरले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
12 ते 14 डिसेंबर दरम्यान अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात देशातील नामवंत शास्त्रीय गायक-वादक उपस्थित राहून संगीतप्रेमींना अविस्मरणीय मैफलांची मेजवानी देणार आहेत.
कल्याण-मुरबाड रस्त्यावर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची मित्रांकडून चाकूहल्ल्यात हत्या. धाब्यावर वाद वाढल्याने हल्ला झाला. परिसरात तणाव वाढला असून पोलिसांनी तपास वेगात सुरू केला आहे.
कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील घटना घराचे मागचे दार का उघडले ? या कारणावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये वादाचे रुपांतर मारहाणीत, घराची केली तोडफोड घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल टिळकनगर पोलिसांकडून तपास…
कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या युवकाच्या मृत्यू प्रकरणाला अनाठायीपणे राजकीय वळण देत ठाकरे बंधूंवर बेसुमार आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी
डोंबिवलीतील ठाणे-ठाकुर्ली उन्नत उड्डाणपूल प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून रखडलेला होता. आता लवकरच या उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचून डोंबिवलीतील गोकुळधाम टॉवरमधून सराईत गुन्हेगार रोशन झा याला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, तलवार, खंजीर आणि चाकूंसह अटक केली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पिसवली, आडीवली परिसरात काही प्रमाणात विकास कामे झाली आहे. मात्र कोविड काळात महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने विकास कामांना ब्रेक लागला होता.
कल्याण पूर्वेत मराठी भाषा न येण्याच्या कारणावरून ४ नशेत तरुणांनी खानावळीत तोडफोड केली आणि दोन नेपाळी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहेत.
कल्याणच्या वरप गावात चारित्र्याच्या संशयातून संतोष पोहळ यांनी पत्नी विद्या हिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने हायप्रोफाईल सोसायटी हादरली आहे.
कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास इंडस टॉवर कंपनीला परवानगी दिली आहे. मात्र कल्याणमधील नागरीकांनी रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झोपलेल्या मजुराच्या कुटुंबातून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी झाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या ६ तासांत बाळाची सुटका केली. आरोपी आत्या-भाचा अटकेत असून तपास सुरू आहे.