4 धक्कादायक कारणे ज्यामुळे नवरा बायकोची नात्यात फसवणूक करतो
कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे की, वैवाहिक जीवनात विश्वास टिकवणे अजिबात सोपे नसते. त्यामुळेच या नात्यात अनेकवेळा असे क्षण येतात की विश्वास आणि प्रामाणिकपणाचा पाया कमकुवत होताना दिसतो. कोणीही एक दिवस फसवणूक करेल किंवा आपल्या जोडीदारापासून वेगळे होईल या विचाराने लग्न करत नाही. परंतु कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते अनेकदा नवरा वा बायको एकमेकांना फसवतात.
नात्यात एकदा विश्वास उडाला की तो तुटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बरं, असं असलं तरी, कोणताही जोडीदार त्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश सहन करू शकत नाही. आजच्या सोशल मीडिया लाइफमध्ये, एखाद्याची फसवणूक करणे ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. नवरा नक्की बायकोला का फसवतो याची काही कारणं नक्कीच धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहेत. अनेक अभ्यासातूनही हे सिद्ध झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केलेल्या अभ्यासानुसार, आपण याची कारणं जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
जोडीदार असूनही एकटेपणा
एकटेपणा वाटल्यामुळे
बरेच लोक म्हणतात की विवाहित पुरुष आकर्षणासाठी किंवा नवीन सुरुवात करण्याच्या इच्छेसाठी दुसरा जोडीदार शोधत असतात. पण सत्य हे आहे की जेव्हा अनेक पुरुषांना त्यांच्या वैवाहिक जीवनात भावनिक आधार मिळत नाही, तेव्हा ते बाहेरील कोणाशी तरी भावनिकरित्या नातं जोडण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला ही जवळीक खूप अनौपचारिक असते, पण हळूहळू ती इतकी खोलवर जाते की त्यानंतर त्यांना एकमेकांशिवाय जगणे कठीण होते.
एकापेक्षा अधिक शारीरिक संबंध वा लैंगिक विविधता
लैंगिक विविधता काही पुरूषांना हवी असते
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या पुरुषांना लैंगिक विविधता हवी असते त्यांचे एक नव्हे तर एकापेक्षा जास्त विवाहबाह्य संबंध असू शकतात आणि असे चित्र नक्कीच अंगावर काटा आणण्यासारखे आहे. वास्तविक, अनेक पुरुषांना एकाच जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे ते महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या बायकोची फसवणूक करतात
हेदेखील वाचा – पती – पत्नीच्या नात्यात ‘वो’ ठरतेय नोकरी, असे सांभाळा नातं दुरावा करा दूर
रटाळ आयुष्य
आयुष्यातील तोचतोचपणा नकोसा वाटतो
हे नाकारता येत नाही की ज्या पुरूषांना त्याच त्याच आयुष्याचा आणि जगण्याचा लवकर कंटाळा येतो. अभ्यासात सांगितल्याप्रमाणे असा पुरुष समोरच्या व्यक्तीकडे त्वरीत आकर्षितच होत नाही तर त्याच्यासोबत आयुष्यातील एक नवीनपणा देखील अनुभवतो आणि आपल्या पत्नीची फसवणूक करतो आणि नव्या स्त्रीसह जवळीक साधतो
सततची कटकट
बायको कानाजवळ सतत कटकट करत असल्यास
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटाच्या समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या एका अभ्यासात म्हटले आहे की, ज्या बायका त्यांच्या पतींशी बोलताना व्यत्यय आणत असतात अथवा आपल्या नवऱ्याला बोलायला देत नाहीत अथवा पती तिच्याशी आपले विचार व्यक्त करणे थांबवतो तेव्हा तो दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो, त्याला असे वाटते की कदाचित कोणीतरी त्याला समजू शकेल. जेव्हा पुरुष बिझनेस ट्रिपवर जातात वा जास्त काळ घराबाहेर असतात तेव्हा ही गोष्ट घडते, कधीकधी ते इतर महिलांना पसंत करू लागतात.
हेदेखील वाचा – नात्यात केवळ प्रेमच पुरेसं नाही, यशस्वी होण्यासाठी जोडीदारांमध्ये ५ गोष्टी हव्याच