पुरूषांना होऊ शकतात ५ प्रकारचे कॅन्सर (फोटो सौजन्य - iStock)
जसजसे पुरुषांचे वय वाढते तसतसे अनेक प्रकारच्या कर्करोगांना बळी पडतात अशी सध्या स्थिती आहे. विशेषत: वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आजारांचा धोका सतत वाढू लागतो. यामध्ये कॅन्सर या घातक आजाराचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत, पुरुषांना हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की त्यांच्या वयोगटातील कोणते कर्करोग सर्वात सामान्य आहेत, कर्करोग कसा टाळता येईल आणि लवकर ओळखण्याचे महत्त्व काय आहे?
सोनीपतच्या एंड्रोमेडा कॅन्सर हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजीचे अध्यक्ष डॉ. दिनेश सिंह यांच्याकडून या लेखात जाणून घेऊया. 40 व्या वर्षानंतर पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोगाबाबत सांगताना कर्करोगाविरूद्धच्या लढ्यात नियमित तपासणी, निरोगी जीवनशैली आणि कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूक असणे खूप महत्वाचे आहे असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. जाणून घेऊया कोणते कॅन्सर अधिक प्रमाणात होतात.
प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer)
पुरूषांमधील प्रोस्टेट कॅन्सर (फोटो सौजन्य – iStock)
पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे तो म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. विशेषत: 50 पेक्षा जास्त वयाच्या पुरूषांना हा रोग होतो. प्रोस्टेट ग्रंथी हा एकमेव अवयव आहे जिथे तो प्रथम दिसून येतो आणि हळूहळू वाढतो, त्यामुळे याची ओळख लवकर होत नाही.
प्रोस्टेट विशिष्ट अँटीजन (PSA), डिजिटल रेक्टल तपासणी (DRE) यासाठी रक्त चाचणी सामान्यतः प्रोस्टेट कर्करोगाच्या तपासणी प्रक्रियेत वापरली जाते. 40 वरील पुरुषांनी या चाचण्यांचे फायदे आणि तोटे याबद्दल त्यांच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे, विशेषत: जर रोगाचा कौटुंबिक इतिहास असेल असेल तर वेळीच याकडे लक्ष द्या.
फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer)
फुफ्फुसाचा कर्करोग ठरतो घातक (फोटो सौजन्य – iStock)
फुफ्फुसाचा कर्करोग हे जगभरातील कर्करोगाच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. धुम्रपान हा मुख्य जोखीम घटक असला तरी, विशिष्ट रसायनांच्या संपर्कात राहणे आणि धूम्रपान करणाऱ्यांच्या आसपास राहणेदेखील एखाद्याचा बळी घेऊ शकते. कधीकधी धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही याचा फटका बसतो.
विशेषत: दीर्घकाळ धुम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी लो-डोस सीटी स्कॅनिंगची शिफारस केली जाते. फुफ्फुसाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखल्यास बरा करता येऊ शकतो आणि त्यावर उपाय करता येतो.
कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancer)
कोलोरेक्टल कॅन्सरची घ्यावी वेळीच काळजी (फोटो सौजन्य – iStock)
40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान बऱ्याचदा होते, जे कोलन किंवा गुदाशय प्रभावित करते. बऱ्याचदा हा कर्करोग सुरुवातीला सौम्य पॉलीप्सच्या स्वरूपात होतो जो नंतर कर्करोगात बदलतो.
कोलोनोस्कोपी आणि इतर नियमित तपासणीद्वारे हे पॉलीप्स शोधून, ते कर्करोगात बदलण्यापूर्वी ते काढून टाकले जाऊ शकतात. कोलोरेक्टल कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असल्यास, पुरुषांनी वयाच्या 45 किंवा त्यापूर्वीपासून वारंवार तपासणी करणे सुरू केले पाहिजे.
मूत्राशयाचा कर्करोग (Bladder Cancer)
४० नंतर मूत्राशयाचा कर्करोग (फोटो सौजन्य – iStock)
मूत्राशयाचा कर्करोग सामान्यत: 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरूषांना होतो आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक सामान्य असतो. औद्योगिक रसायनांचा संपर्क आणि धुम्रपान हे यातील धोक्याचे घटक आहेत.
लघवी करताना वेदना होणे, वारंवार लघवी होणे आणि लघवीमध्ये रक्त येणे ही त्याची लक्षणे असू शकतात. सिस्टोस्कोपी आणि लघवी चाचणी लवकर ओळखण्यात मदत करू शकते, त्यामुळे पुरुषांना ही लक्षणे आढळल्यास त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मेलेनोमा (Melanoma)
मेलोनोमा म्हणजे काय (फोटो सौजन्य – iStock)
मेलेनोमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्वचेच्या कर्करोगाचा एक गंभीर प्रकार टॅनिंग बेड आणि सूर्यप्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्काशी संबंधित आहे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी त्यांच्या त्वचेतील बदल तपासण्यासाठी वर्षातून एकदा त्वचारोगतज्ज्ञांना भेटले पाहिजे, ज्यामध्ये नवीन तीळ दिसणे किंवा त्वचेमधील बदल दिसून येतात. लवकर तपासणी करणे हे मेलेनोमा उपचारातून अनुकूल परिणामाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकते.