डेंग्यूचा ताप
डेंग्यूचा प्रसार एडिस डासांमुळे होतो, जे झिका आणि चिकुनगुनियासारखे विषाणू देखील पसरवतात. डेंग्यू ताप हा फ्लूप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला थेट संसर्गजन्य नसतो. परंतु डेंग्यूच्या रुग्णाला चावणारा डास जर निरोगी व्यक्तीला चावला तर त्यालाही डेंग्यू होऊ शकतो.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, बहुतेक लोक डेंग्यू तापातून 3-7 दिवसांत सहज बरे होतात. तुम्हाला डेंग्यू तापाची लक्षणे आढळल्यास, तुमचा डेंग्यू गंभीर होण्याची शक्यता 20 पैकी 1 आहे. यामध्ये शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. येथे तुम्हाला डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूमधील लक्षणे
टीप: डेंग्यूच्या बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. परंतु इतर प्रकरणांमध्ये, डेंग्यू तापाची लक्षणे डास चावल्यानंतर चार ते 10 दिवसांनी दिसू लागतात आणि ती तीन ते सात दिवस टिकू शकतात. त्यामुळे रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
पपईच्या पानांचा चहा प्या
पपईच्या पानांचा करा उपयोग
डेंग्यूमध्ये पपईचे पान खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने लक्षणांपासून लवकर आराम मिळण्याची शक्यता असते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, पपईच्या पानांचे पाणी डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी करत नाही. अशा वेळी पपईची पाने पाण्यात उकळून दिवसातून एकदा प्या.
तुळशीच्या पानांचा काढा
तुळशीच्या पानांचा काढा
डेंग्यूचा उच्च ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा काढा घेतल्यास खूप आराम मिळतो. तुळशीचा काढा आयुर्वेदात वर्षानुवर्षे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संक्रमणाशी लढण्यासाठी औषध म्हणून वापर केला जात आहे. याचा कोणताही दुष्परिणामही होत नाही.
शरीर हायड्रेटेड ठेवा
पाणी पित राहा
डेंग्यूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळे खा. शक्यतो नारळ पाणी, लिंबू पाणी आणि ताक यांचे सेवन करा.
निरोगी आणि हलके अन्न महत्वाचे
हलके अन्न खा
डेंग्यूच्या बाबतीत शक्यतो भाज्यांचे सेवन करा. तुमच्या आहारात हंगामी आणि वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांचा समावेश करा. असे केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ए, झिंक, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळतील जे डेंग्यूचा संसर्ग दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच बाहेरचे अन्न किंवा तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नका.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.