झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी योगासन
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि मानसिक ताणतणाव यांचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. आजच्या पिढीतील लोकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सकाळी उशिरा उठणे आवडते, त्यामुळे बॉडी क्लॉक बिघडायला लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री वेळेवर झोपत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये बसून पुरेशी झोप न घेता तासन्तास कॉम्प्युटरवर काम करते, तेव्हा यामुळे तणाव आणि थकवा येतो, ज्यामुळे अनेकदा लोकांना झोपेचा त्रास होऊ लागतो.
चांगली झोप केवळ आपले शारीरिक आरोग्यच सुधारत नाही तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाची असते. जर तुम्हालाही निद्रानाश किंवा खराब झोपेचा त्रास होत असेल तर योगाच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. या लेखात, योसोम योगा स्टुडिओ, नोएडाचे योग शिक्षक रजनीश शर्मा झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 5 योगासने सांगत आहेत, ज्याचा सराव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. (फोटो सौजन्य – iStock)
विपरिता करणी आसन (Viparita Karani Asana)
झोपेच्या गुणवत्तेसाठी
ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो त्यांनी दररोज विपरिता करणी आसनाचा सराव करावा. विपरिता करणी आसन मानसिक तणाव कमी करून मन शांत करते, ज्यामुळे झोप सुधारते. यासोबतच या आसनाचा सराव केल्याने रक्त प्रवाह सुधारतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तणावामुळे निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांनी प्राणायामासोबत विपरिता करणी आसनाचा सराव करावा.
उत्तानासन (Uttanasana)
निद्रानाशावर मात करण्यासाठी
निद्रानाशाच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी उत्तानासनाचा सराव करणे देखील फायदेशीर आहे. या आसनाचा सराव केल्याने शरीरातील प्रमुख स्नायू ताणले जातात, ज्यामुळे तणाव कमी होतो. यासोबत उत्तानासनाचा सराव केल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि झोपेची गुणवत्ताही वाढते.
हेदेखील वाचा – महिन्यात येईल त्वचेवर चमक; करा ‘ही’ योगासने, वाढावा चेहऱ्यावरील तेज
अर्ध उत्तानासन (Ardha Uttanasana)
या आसनामुळे शांत झोप येईल
अर्ध उत्तानासनाच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते, ज्यामुळे तणावाच्या समस्या कमी होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. अर्ध उत्तानासनामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो आणि मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो. झोपेचा दर्जा सुधारण्यास मदत मिळते
सुप्त बद्ध कोनासन (Supta Baddha Konasana)
झोपेच्या शांतीसाठी करा सुप्त बद्ध कोनासन
सुप्त बद्ध कोनासन तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि त्याचा सराव केल्याने ओटीपोटाचा भाग मजबूत होतो. हे आसन मन शांत करते आणि मानसिक तणाव दूर करते, अशा स्थितीत मन शांत होते, झोपेची गुणवत्तादेखील सुधारते. सुप्त बद्ध कोनासनाच्या सरावाने पचनसंस्था चांगली काम करते. चांगल्या झोपेसाठी निरोगी पचनसंस्था आवश्यक आहे. कारण पोटाच्या समस्यांमुळे झोपेत अडथळा येतो. जर तुम्ही झोपेच्या समस्येने त्रस्त असाल तर या आसनाचा तुमच्या दैनंदिनीमध्ये समावेश करा.
सुखासन (Sukhasana)
सुखासनाने सुधारेल झोपेचा दर्जा
सुखासनाचा नियमित सराव निद्रानाश आणि झोपेच्या समस्यांशी सामना करण्यास मदत करतो. याचा नियमित सराव केल्याने झोप तर सुधारतेच पण मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारते. सुखासन पोट आणि आतडे आराम करण्यास मदत करते, ज्यामुळे पचनसंस्था योग्य प्रकारे कार्य करते.