Yoga For Hypertension: आजच्या व्यस्त जीवनात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि कमी झोप यासारख्या जीवनशैलीतील समस्या ही रक्तदाब वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. मात्र औषधांसोबतच काही नैसर्गिक उपाय आहेत जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करू शकतात. योग हा त्यापैकीच एक. योगासनाने शरीर तर निरोगी राहतेच पण मनही शांत होते. काही योगासने नियमितपणे केल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया त्या 5 योगासनांविषयी जे नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य - iStock)
योगा हा आपल्या मनाला आणि शरीराला अत्यंत फायदेशीर ठरतो. गेल्या काही वर्षात योगाचे महत्त्व खूपच वाढले आहे. उच्च रक्तदाबासाठी कोणते योग करावेत जाणून घ्या
भुजंगासनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो आणि ताण कमी होतो. हे हृदयाचे ठोके संथ करते आणि रक्तदाब कमी करते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी ही कोब्रा पोझ करावी
शशांक या आसनामुळे तणाव आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसंच या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो आणि पोटातील अवयव मजबूत होतात
त्रिकोणासनामुळे शरीर लवचिक होते आणि रक्तदाब कमी होतो. हे आसन तणाव कमी करण्यास आणि मूड सुधारण्यासदेखील मदत करते
शवासन एक विश्रांतीची मुद्रा आहे जी तणाव आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे आसन शरीर आणि मन दोन्ही शांत करते
मत्स्यासन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि रक्तदाब कमी करते. या आसनामुळे तणाव कमी होण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यासही मदत होते