Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओरीने दाखवली अंबानीच्या ग्रँड क्रूझ पार्टीची झलक, लक्झरी रूम आणि इटलीचा नयनरम्य समुद्र

29 मे पासून चार दिवस इटलीमध्ये अंबानी कुटुंबीयांचा लाडका मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पार्टी रंगणार आहे. सध्या तिथला नजारा कसा आहे याची खास झलक अंबानीच्या कुटुंबीयांच्या जवळ असणाऱ्या ओरीने दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 29, 2024 | 12:15 PM
Ambani

Ambani

Follow Us
Close
Follow Us:

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला आज 29 मे पासून सुरुवात होणार आहे. बॉलीवूडमधील सर्व स्टार्स आणि अनेक मोठ्या व्यक्तींची या ठिकाणी हजेरी लागणार आहे.  इटलीमध्ये एका ग्रँड क्रुझवर 29 मे ते 1 जून या कालावधीत ही पार्टी रंगणार आहे. हे क्रुझ इटली ते फ्रान्स असा 4380 किलोमीटरचा प्रवास करेल आणि यादरम्यान अनेक पार्ट्या, लंच-डिनर, मजा आणि मस्ती रंगणार आहे.

बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याची पहिली काही अमेझिंग छायाचित्रे आता समोर आली आहेत. हे फोटो या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्वांच्या लाडक्या ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्याचे अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका ही त्याची जवळची मैत्रीण असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य – @orry Instagram)

कोण आहे ओरी?

ओरी अर्थात ओरहान अवतरामानी नक्की कोण आहे हे अनेकांना माहीत नाही. मात्र अनेक सेलिब्रिटींसह ओरी कायम पार्टीमध्ये उपस्थित असतो आणि एका सेल्फीसाठी २५ लाख रुपये घेतो असं सांगण्यात येते. तो एक बिझनेसमॅन असून त्याचा नक्की कोणता उद्योग आहे हे मात्र अद्यापही अनेकांना माहीत नाही.  

युरोप ट्रीपला निघताना ओरीला मुंबई विमानतळावर पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. अंबानींच्या या लक्झरी क्रूझ पार्टीची सर्वत्र चर्चा होत असतानाच ओरीने क्रूझ आणि बीचचे काही फोटो शेअर केले आहेत जे पोएटो इटली, सार्डिनिया येथील आहेत. ओरीने त्याच्या खोलीची झलकही दाखवली आहे.

[read_also content=”अनंत अंबानीच्या लग्नासाठी आई नीता अंबानीच्या २ इच्छा https://www.navarashtra.com/lifestyle/mother-nita-ambanis-2-wishes-for-anant-ambanis-marriage-statement-made-for-daughter-in-law-radhika-539457/”]

बीचवरील फोटो केले शेअर 

ओरीने हे सर्व फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने क्रूझमध्ये त्याच्या खोलीतून दिसणारा समुद्र टिपला आहे. पलंगावर एक पिशवी आहे, समुद्राच्या लाटांना लागून खिडक्यांजवळ खुर्च्या आहेत आणि या सर्व गोष्टींसह ओरीने एकच गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे – परफेक्ट मॉर्निंग

क्रुझच्या आतील लक्झरी

याशिवाय ओरीने इटलीतील पोएटो बीचची सुंदर झलक दाखवली आहे. तसंच या क्रूझचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बरेच फटाके फुटताना दिसत आहेत. यामध्ये ही क्रुझच्या आतला प्रत्येक कोपराही दिसून येत आहे. अंबानी कुटुंबीयांची पार्टी म्हणजे नक्कीच लॅविश असणार यामध्ये कोणाचेही दुमत नसेल. 

कसा असेल लुक 

चार दिवस रंगणाऱ्या पार्टीमध्ये अंबानी कुटुंबीयांचा आणि इतर सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचा लुक कसा असेल याकडेही आता साऱ्यांच्या नजरा आहेत. चाहते हे जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक आहेत. तर या दुसऱ्या प्री-वेडिंग बॅशमध्ये अंबानी कुटुंबीयांचा पोशाख कसा असेल आणि आता किती कोटी किमतीचे दागिने घातले जातील यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Web Title: Anant ambani cruise party inside first pics shared by orry looks stunning luxury rooms and beaches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • anant ambani radhika merchant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.