
नाते कोणतेही असो आपण कधी ना कधी भावनिकरित्या दुखावतो. त्यावेळी आपले रागावर कंट्रोल राहत नाही. आणि आपण भांडणात एक्स्प्रेस सुटतो. स्वतःवर केलेल्या आरोपांचा किंवा प्रश्नांचा विचार न करता वाद घालू लागतो. भांडताना किंवा वाद सुरू असताना तेव्हा लोकांना उत्तर देण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारा, असा सल्ला सायकॉलॉजिकल काऊंसलर ल्युसिल शेकलटन यांनी दिला आहे.