स्वयंपाकघरात सहज आणि नेहमीच उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे ओवा. ओव्याचा वापर हा अनेक प्रकारे केला जातो. बऱ्याचदा ओव्याला अनेक आजरांवरचा रामबाण उपाय म्हणूनही ओळखले जाते. प्रसूतीनंतरअनेक महिलांना ओवा पाण्यात उकळून दिला जातो. तुम्हाला माहित आहे का? घरात सहज आणि नेहमीच उपलब्ध असणाऱ्या या ओव्याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
ओव्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात. अनेकदा जेवण नीट पचले नसल्यास ओव्याचे सेवन केले जाते. ओवा पोट साफ करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. हे सर्दी, खोकल्यावही उपचार करते. असेच काही ओव्याचे निरनिराळे फायदे आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.
[read_also content=”रोजच्या आहारात प्रथिनांचा समावेश कसा करावा, सविस्तर वाचा https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-include-protein-in-daily-diet-read-in-detail-534830.html”]
बॅक्टेरिया किलर
ओव्यामध्ये अँटी मायक्रोबाईल गुणधर्म असतात. ज्यामुळे हे बॅक्टेरिया आणि बुरशीपासून संरक्षण करण्यास मदत करते. ओव्यामध्ये थायमॉल आणि कार्व्हाक्रोल आढळतात, जे जीवाणूनाशक आणि बुरशीनाशक आहेत. एका टेस्ट ट्यूब अभ्यासानुसार, ओव्यामुळे अन्नातून विषबाधा होणाऱ्या बॅक्टेरिया देखील नष्ट होऊ शकतात. म्हणूनच ओवा तुमच्या पोटासाठी चांगला मानला जातो.
रक्तदाबावर फायदेशीर
जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर ओव्याचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ओव्यामध्ये आढळणारे थायमॉल कॅल्शियम वाहिन्यांना रोखण्याचे करण्याचे काम करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा दाब कमी होतो. तथापि, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
कोलेस्टेरॉलसाठी फायदेशीर
ओव्याच्या बिया शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ओव्याची पावडर शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.
वजन कमी करण्यास होते मदत
ओव्यांमध्ये आढळणारे थायमॉल पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. याच्या मदतीने शरीरातील चरबीच्या पेशीदेखील खंडित होतात. तुम्हाला जर का, तुमचे वजन कमी करायचे असेल तर यासाठी तुम्ही ओव्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि मग सकाळी या बिया गरम पाण्यात उकळवून घ्या आणि मग हे पाणी गाळून प्या.
गर्भधारणेनंतर दिले जाते ओव्याचे पाणी
ओव्यामध्ये आढळले जाणारे गुणधर्म हे दाहक विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे नवजात शिशुला आणि आईला संसर्गाचा धोका कमी होतो. मात्र, गरोदर महिलांनी आणि स्तनपान सुरू करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय चुकुनही ओवा किंवा ओव्याचे पाणी सेवन करू नये.