फोटो सौजन्य: iStock
संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीमुळे गारठला आहे. खासकरून ग्रामीण भागात लोकांना थंडीमुळे बाहेर पडावे असे वाटत नाही आहे. तर दुसरीकडे माळशेज घाट, लोणावळा, माथेरान आणि माळशेज सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे.
हिवाळा म्हंटलं की अनेकांना गरमागरम जेवण लागते. थंड पेयच काय तर अनेक जण थंड पाण्याने अंघोळ करण्यास सुद्धा कचरत असतात. अशावेळी शरीराला गरम ठेवण्यासाठी आपण उबदार कपडे वापरात असतो. पण याच थंडीत अनेक जण व्हेजिटेबल सूप सुद्धा पिताना दिसतात. व्हेजिटेबल सूप प्यायल्याने फक्त आपले शरीराचं उबदार होत नाहीत, तर त्या व्यतिरिक्त अन्य फायदे देखील होताना दिसतात.
ज्यांना भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी सूप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमच्या शरीराला उष्णता मिळेल. याशिवाय सूप प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत राहते. सहसा लोक गाजर आणि टोमॅटो सूप पितात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिक्स व्हेज सूप बनवूनही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला दुहेरी फायदा होईल. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
हिवाळ्यात करू नका ‘या’ फळांचे सेवन; चवीच्या नादात बिघडेल आरोग्य
हिवाळ्यात मिक्स्ड व्हेज सूप प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. गाजर, पालक, शिमला मिरची आणि टोमॅटोपासून बनवलेल्या सूपमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे तुम्हाला आतून उबदार देखील ठेवते.
अनेकदा हिवाळ्यात जास्त खाल्ल्याने वजन वाढते. अशा परिस्थितीत मिक्स्ड व्हेज सूप हा एक चांगला पर्याय असू शकतो. मिक्स व्हेज सूपमध्ये कॅलरीज कमी असतात आणि भरपूर पोषक असतात. हे प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. तसेच हे तुम्हाला जास्त खाण्यापासून वाचवते.
मिश्र भाज्यांच्या सूपमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. पचनसंस्थाही मजबूत असते. सूप प्यायल्याने झटपट ऊर्जाही मिळते. हे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे. हिवाळ्यात रोज सूप प्यायल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.
सांधेदुखीची समस्या सहसा हिवाळ्यात उद्भवत असते. मिक्स व्हेज सूपमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. म्हणूनच जेष्ठांनी सुद्धा व्हेजिटेबल सूप प्यावे.
जर तुम्ही हिवाळ्यात मिश्र भाज्यांचे सूप तुमच्या आहाराचा भाग बनवले तर ते तुमच्या शरीरातील कमजोरी दूर करू शकते. याचे सेवन केल्याने थकवा जाणवणार नाही आणि शक्तीही मिळेल. तुम्ही व्हेजिटेबल सूप रोज पिऊ शकता.