फेसपॅक लावण्याचे फायदे
चमकदार आणि गोऱ्यापान त्वचेवर पिंपल्स किंवा पिगमेंटेशनचे काळे डाग आल्यानंतर चेहऱ्याचे सौदंर्य खराब होऊन जाते. महिलांच्या शरीरात सातत्याने बदल होत असतात. हे बदल कधी आरोग्यसंबंधित असतात, तर कधी त्वचा आणि केसांशी निगडित असतात. शरीरात होणाऱ्या बदलांचे परिणाम त्वचेवर दिसून आल्यानंतर चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल, गर्भधारणा, त्वचेची काळजी न घेणे, चुकीचा आहार घेणे इत्यादी गोष्टींमुळे चेहरा खराब होऊन जातो. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे पिगमेंटेशनची समस्या वाढत जाते. चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी अनेक महिला बाजार मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स किंवा इतर प्रॉडक्ट वापरतात. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील पिगमेंटेशन घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
फेसपॅक लावण्याचे फायदे
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेक लोक नियमित दही खातात. दह्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराला थंडावा देतात. उष्णतेमुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी दह्याचा वापर करा. दह्यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत होते. दह्यात असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेवर जमा झालेला मेलीनीनचा थर कमी करून त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करते. तसेच त्वचेला दही लावल्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. शरीराला हायड्रेट करण्यासाठी नियमित अर्धा वाटी दही खावे.
हे देखील वाचा: कोंड्यापासून मुरुमांपर्यंत अनेक समस्यांवर मुलतानी माती आहे रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे
फेसपॅक लावण्याचे फायदे
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. काकडीमध्ये नैसर्गिक थंडावा असतो. उष्णतेमुळे खराब झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी काकडीचा वापर करा. काकडीचा रस किंवा किसलेली काकडी त्वचेवर लावल्यामुळे त्वचेमधील आर्द्रता टिकून राहते आणि चेहऱ्यावरील काळेपणा कमी होतो. काकडीमध्ये असलेले अँटीऍक्सीडेन्टमुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.
चेहऱ्यावर महागड्या आणि केमिकल युक्त क्रीम्स लावण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत करते. चेहऱ्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेवर केमिकल क्रीम लावण्याऐवजी फेसपॅक, फेसमास्क किंवा इतर घरगुती पदार्थ लावावे, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील सौदंर्य कायम टिकून राहील.