जागतिक स्तनपान सप्ताह
बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिले 6 महिने बाळ हे आईच्या दुधावरच असते. मात्र स्तनपानास सुरुवात करताना अनेक अडचणी येतात ज्यामुळे आईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. परंतु बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
कारण चुकीच्या पद्धतीने स्तनपान मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो.बऱ्याचदा स्तनपानामुळे आईला थकवा देखील जाणवू शकतो. डॉ. श्वेता लालगुडी, स्त्रीरोगतज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी जागतिक स्तनपान सप्ताहच्या निमित्ताने महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
स्तनपान पहिल्यांदा करताना काय होते?
कसे करावे स्तनपान
स्तनपानास सुरुवात केल्यास पहिल्याच आठवड्यात सौम्य वेदना जाणवू शकतात. कारण तुमचे बाळ देखील हळहळी दूख ओढणे, चोखणे आणि गिळणे या प्रक्रिया शिकते. नवीन मातांनी हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा बाळाला नीट चोखता येत नाही तेव्हा स्तनाग्रांमध्ये वेदना होऊ शकते. यामुळे तुमचे स्तनाग्र सुजतात आणि लाल होऊ शकतात. हे दूध पाजताना त्या बाळाला नीट पकडा ज्यामुळे बाळाला चोखणे आणि गिळणे सोपे होते.
हेदेखील वाचा – स्तनपान करताना काय करावे जाणून घ्या!
कमी दूध किंवा दूध अजिबात न येणे
बऱ्याच स्तनदा मातांना दूध वाढविण्यासाठी अनेक समस्या उद्भवतात. पोषक आहाराची कमतरता, तणाव किंवा नैराश्य, बाळाला स्तनपान करण्याची इच्छा नसणे आणि जीवनशैलीचे घटक जसे की मद्यपान, धूम्रपान, झोप न लागणे आणि चूकीच्या आहाराचे सेवन करणे हे तुमच्या दुधाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम करू शकतात. जर हे चिंतेचे कारण ठरत असले तर स्तनपान विशेय तज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते.
छातीत दुधाच्या गाठी होणे
स्तनपान करताना काय काळजी घ्यावी
स्तनपान करताना बाळाला योग्य पद्धतीने स्तनाग्रे चोखता न आल्याने हा त्रास उद्भवतो. स्तनांमधील दुधाचे प्रमाण वाढून ते पूर्णपणे भरून जातात. स्तनाग्रांना दुखणे, बाळाच्या हिरड्यांमुळे तिथे जखम होणे असे प्रकारही होऊ शकतात. यामुळे अस्वस्थता येते कारण आईला स्तनामध्ये जडपणा आणि घट्टपणा जाणवू शकतो. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
हेदेखील वाचा – स्तनपान करताय! मग,आहारात हे खाल्ल्यास बाळाचं पोषण चांगलं होणारच !
स्तनांना सूज येणे (Mastitis)
या स्थितीत स्तनांवर सूज येऊ शकते, स्तनांचा दाह होतो किंवा ते दुखतात आणि तो बॅक्टेरियाचा संसर्ग असू शकतो. यावर वेळेत योग्य उपचार झाले नाही स्तनदाहामुळे स्तनपान थांबू शकते. जेव्हा दुधाची नलिका अवरोधित केली जाते आणि वेळीच लक्ष दिले जात नाही तेव्हा असे होते.