महिलांनी पाळीदरम्यान शारीरिक संबध ठेवल्यास गरोदर राहू शकतात का
गर्भधारणेचा काळ हा कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. अनेक वेळा नको असलेल्या गर्भधारणेमुळे महिलांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अवांछित अर्थात नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी, जोडपे अनेकदा संरक्षणाचा वापर करतात. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की मासिक पाळी दरम्यान गर्भधारणा होऊ शकत नाही. काही वेळा तर कंडोम वापरल्यानंतरही महिला गरोदर राहू शकतात असे समोर आले आहे. कंडोमचा योग्य वापर न केल्याने असे होऊ शकते.
काही जोडपी मासिक पाळीला संरक्षण मानतात. या संदर्भात शारदा हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रुची श्रीवास्तव यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होऊ शकत नाही हे खरे आहे का ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
मासिक पाळी आणि प्रेगन्सी
बहुतेक महिलांना असे वाटते की मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होऊ शकत नाही. पण हे खरे नाही. डॉ. रुची यांच्या मते, बहुतेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या मध्यभागी ओव्हुलेशन होते. मासिक पाळीच्या दरम्यान, अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये जाते जिथे ते २४ तास राहते. अशा परिस्थितीत, जर या काळात शुक्राणू अंड्यांना भेटले तर गर्भधारणा होऊ शकते.
Pregnancy दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून योग्य माहिती
मासिक पाळीदरम्यान गर्भ राहू शकतो का
डॉक्टरांच्या मते, मासिक पाळी दरम्यान गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते परंतु याचा अर्थ असा नाही की मासिक पाळी दरम्यान गर्भधारणा होऊ शकत नाही. मासिक पाळीच्या काळातही गर्भधारणा होऊ शकते. यादरम्यान ओव्ह्युलेशनमुळे शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंध ठेवतानाच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे
ओव्ह्युलेशन सायकल
जर तुमची मासिक पाळी दर महिन्याला वेळेवर येत असेल तर तुम्ही तुमचे ओव्हुलेशन चक्र शोधू शकता. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी, गर्भधारणेच्या वेळीच काही खबरदारी घ्यावी. तसंच तुम्ही मासिक पाळीतही जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर कंडोमचा वापर करायला अजिबात विसरू नका. यावेळी अधिक काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. तुम्हाला जर गरोदर रहायचे नसेल, तुमची इच्छा नसेल आणि मासिक पाळीच्या वेळी तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचा असेल तर न विसरता कंडोमचा वापर करावा अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही गर्भनिरोधक गोळीही घेऊ शकता
गरोदर महिलांसाठी किती फायदेशीर ठरतो योग? गायनॅकने सांगितले महत्त्व
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.