गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, तज्ज्ञांचा सल्ला (फोटो सौजन्य - iStock)
गरोदरपणात शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. हार्मोन्स बदलतात आणि शारीरिक बदलही जाणवतात. यासोबतच प्रेमाची अधिक गरज भासते. असं असलं तरी, शारीरिक संबंध म्हणजे केवळ शारीरिक सुख नाही तर ही क्रिया भावनांशीही तितकाच निगडीत आहे.
जेव्हा स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील या गुंतागुंतीच्या टप्प्यातून जात असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून काळजी आणि सहवासाचीही गरज असते. गरोदरपणातही बहुतेक महिलांना शारीरिक संबंध ठेवायलाआवडते. पण ते सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याबाबत डॉ. अंजली कुमार यांनी आपल्या मैत्री वुमन या इन्स्टाग्राम पेजवर सर्व प्रश्नांबाबत उत्तरं दिली आहे. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिने आपल्या जोडीदारासह शारीरिक संबंध ठेवावेत की नाही जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
गरोदर असताना शारीरिक संबंध योग्य?
तज्ज्ञांनी दिले स्पष्टीकरण
शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे, पण शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लैंगिक संबंधाबाबत अनेकांच्या मनात एक प्रश्न पडतो की जोडीदार गरोदर असताना शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की नाही?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरोदरपणात महिलांना शारीरिक संबंधामध्ये जास्त आनंद मिळतो. याचे मुख्य कारण म्हणजे जननेंद्रियांमध्ये रक्तप्रवाह वाढल्याने ते अतिशय संवेदनशील होऊ शकतात. तसेच, गर्भधारणेदरम्यान स्तन देखील अधिक संवेदनशील होतात. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंजली कुमार गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधांना परवानगी देतात, परंतु अशावेळी काही सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. अंजली कुमार यांनी त्यांच्या मैत्री वुमनच्या इन्स्टाग्राम पेजवर हा मुद्दा उपस्थित केला आणि लिहिले: “गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध सुरक्षित आणि निरोगी असतो. “हे ऑक्सिटोसिन सोडते जे गरोदरपणातील तणावाचा सामना करण्यास मदत करते, झोप सुधारते आणि काही काळ तुम्हाला वेदना विसरण्यासदेखील मदत करते.” असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
बाळाला नुकसान होते का?
गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवल्यास बाळाला नुकसान होते का?
डॉक्टरांनी पुढे सांगितले की, अनेकदा लोक हा प्रश्न विचारतात की, गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध कधी ठेवावे? किंवा गरोदरपणात शारीरिक संबंधामुळे मुलावर काय परिणाम होतो? याला दिलेल्या उत्तरात डॉ. अंजली कुमार म्हणतात, “गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर (Trimster) शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित असते आणि त्यामुळे गर्भातील बाळाला कोणतेही नुकसान होणार नाही. अशावेळी महिलांना गर्भपात किंवा वेदना होण्याची भीती वाटते. जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर काही धोका असेल तर डॉक्टर तपासणी करून आवश्यक सल्ला देतील.
काय होतो फायदा
डॉ. अंजली कुमार यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंधाचा एक फायदा म्हणजे प्रसूतीसाठी स्नायू मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवताना गर्भाला कोणतीही हानी होत नाही, कारण शारीरिक संबंधामध्ये वापरण्यात येणारे अवयव वेगळे असतात. या प्रक्रियेचा गर्भाशी काहीही संबंध नाही.
बाळाभोवती अम्नीओटिक द्रवपदार्थाचे वर्तुळ असते जे गर्भाचे संरक्षण करते. हे गर्भाशयात अम्नीओटिक पिशवीमध्ये गुंडाळलेले असते. शारीरिक संबंधादरम्यान प्रवेश योनीमध्ये होतो आणि गर्भाशयावर कोणताही परिणाम होत नाही.
काळजी घेण्याची गरज
गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला कारण यावेळी जर STD म्हणजेच लैंगिक संक्रमित रोग (शारीरिक संबंधा्मुळे होणारा आजार) झाला तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कंडोम वापरा आणि शरीराच्या अवयवांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
कशी घ्याल काळजी
गरोदरपणादरम्यान कशी घ्याल काळजी
आरामदायी आणि ओटीपोटावर जास्त दाब न देणारी शारीरिक संबंधाची पोझिशन निवडा. महिलांनी या काळात पाठीवर आणि पोटावर झोपणे टाळावे. डॉ. अंजली कुमार यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान ओरल शारीरिक संबंध ठेवणे हे अधिक सुरक्षित असते. परंतु हे लक्षात ठेवा की जोडीदाराने शारीरिक संबंध ठेवताना योनीमध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे योनीमध्ये हवेचे फुगे तयार होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात, जे गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भासाठी हानिकारक ठरू शकतात.
गरोदरपणात कधी शारीरिक संबंध ठेऊ नयेत?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराशी बोलणे. आयुष्याच्या या टप्प्यावर, भागीदारांमधील समन्वय खूप महत्वाचा आहे. असे नाही की गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवणे आवश्यक आहे. फक्त भागीदारांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे, त्यांच्या गरजा आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जवळीक टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक संबंध हा एकमेव मार्ग नाही. जोडपे एकमेकांना Kiss करू शकतात वा एकमेकांना मिठी मारू शकतात अथवा एकत्र चांगला वेळ घालवता येईल हेदेखील त्यांनी आवर्जून सांगितले
काय म्हणाल्या डॉ. अंजली कुमार