Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी टाळता येते का? लक्षणे आणि उपाय काय? जाणून घ्या

एका तासाच्या आत सतत कळा अनुभवणे जे शारीरिक स्थिती बदलल्यानंतर किंवा पुरेसा आराम केल्यावरही कमी होत नाही. पाठीच्या खालच्या भागात दुखणे जे अधूनमधून किंवा सतत असू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2024 | 02:00 PM
प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी टाळता येते का? लक्षणे आणि उपाय काय? जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

मुदतपूर्व प्रसुती हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. दरवर्षी लाखो बाळांचा अकाली जन्म होत होतो. गर्भधारणेच्या 24 ते 34 आठवड्यांमध्ये (अर्ली प्रीटर्म) आणि 34 ते 37 आठवडे (लेट प्रीटर्म) दरम्यान गर्भाशयाचे मुख उघडते तेव्हा अकाली प्रसूती होते आणि त्यात अकाली मुल जन्माला येते.

जितक्या लवकर बाळाचा अकाली जन्म होईल तितका जास्त आरोग्याविषयक धोका अधिक असतो. अनेक अकाली जन्मलेल्या बाळांना नवजात अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये विशेष दाखल करण्याची आवश्यकता भासते. मुदतपूर्व प्रसूतीचे नेमके कारण अनेकदा अज्ञात असते, आणि काही जोखीम घटक मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता वाढवू शकतात, हे गर्भवती महिलांमध्ये कोणत्याही ज्ञात जोखीम घटकांशिवाय आढळून येऊ शकते.

मुदतपूर्व प्रसूतीची कारणे:

जर तुम्ही अकाली बाळाला जन्म दिला असेल, जुळी अथवा तिळी असा एकाधिक गर्भ असलेल्या महिला. गर्भाशयासंबंधी काही समस्या असतील तर अकाली प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. भूतकाळात योनीमार्ग, गर्भाशय मुखासंबंधी काही समस्या आढळल्यास मुदपूर्व प्रसुतीची शक्यता असते.

[read_also content=”उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून ‘या’ नवीन गोष्टी शिकवा https://www.navarashtra.com/lifestyle/teach-these-new-things-so-that-children-dont-get-bored-during-summer-vacation-536587.html”]

लक्षणे कोणती?

एका तासाच्या आत सतत कळा अनुभवणे जे शारीरिक स्थिती बदलल्यानंतर किंवा पुरेसा आराम केल्यावरही कमी होत नाही. पाठीच्या खालच्या भागात दुखणे जे अधूनमधून किंवा सतत असू शकते. ओटीपोटात वेदना, काहीवेळेस अतिसारासह वेदना आढळून येतात.

काय आहेत चिन्हे

ओटीपोटात किंवा योनीमध्ये वाढलेला दाब, सतत मासिक पाळीसारख्या वेदना येणे. योनीवाटे येणारा स्त्राव वाढणे, शक्यतो गुलाबी किंवा श्लेष्मासारखा रंग. योनीवाटे बाहेर पडणारे द्रवपदार्थ, अम्नीओटिक द्रवपदार्थ. योनीवाट रक्तस्त्राव, फ्लू सारखी लक्षणे जसे की मळमळ आणि उलट्या आणि गर्भाच्या हालचाली कमी होणे ही काही चिन्हे आहेत.

कोणती आहेत विविध कारणे 

विविध कारणांमुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढू शकतो, जसे की पूर्वीच्या मुदतपूर्व प्रसूतीचा किंवा अकाली जन्मलेल्या बाळाचा वैद्यकीय इतिहास, एकापेक्षा जास्त गर्भ धारण करणे, गर्भाशय मुख लहान होणे, गर्भाशयाच्या किंवा प्लेसेंटल समस्या, धूम्रपान किंवा बेकायदेशीर औषधांचा वापर करणे, काही संक्रमण, उच्च रक्तदाब यांसारख्या जुनाट परिस्थिती आणि मधुमेह, धकाधकीच्या जीवनातील घटना, अति अम्नीओटिक द्रवपदार्थ, गर्भधारणेदरम्यान योनीतून रक्तस्त्राव, गर्भाच्या जन्मातील दोष आणि गर्भधारणेदरम्यानचे विशिष्ट अंतर.

काय आहे गुंतागुंत

अकाली बाळाचा जन्म होणे, ज्यामुळे कमी वजन, श्वसनविषयक आव्हाने, अविकसित अवयव आणि दृष्टीदोष यासारख्या विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अकाली जन्मलेल्या मुलांनाही सेरेब्रल पाल्सी, शिक्षणात अडचणी आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांची शक्यता असते.

[read_also content=”मुख्य गेटवर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम https://www.navarashtra.com/lifestyle/is-it-auspicious-or-inauspicious-to-install-a-ganesha-idol-at-the-main-gate-know-the-rules-of-vastu-536555.html”]

मुदतपूर्व प्रसुती व्यवस्थापन

तणावाचे व्यवस्थापन करणारे मेडिटेशन आणि विश्रांती तंत्राचा अवलंब करणे जे मुदतपूर्व प्रसूतीचा अनुभव घेणाऱ्या फायदेशीर ठरते. तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करणे व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे. संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे, पौष्टिक आहाराचे सेवन करणे आणि धूम्रपान आणि अवैध औषधांसारखे हानिकारक पदार्थ टाळणे स्त्रियांसाठी फायदेशीर आहे.

डॉ प्रसाद कुलट, वरीष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पिटल, पुणे

Web Title: Causes symptoms risk factors of preterm birth why is increasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 01:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.