
चांदीपुरा विषाणूपासून रक्षण कसे करायचे
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. या विषाणूनंतर अनेक वेगवेगळे विषाणू राज्याच्या विविध भागांमध्ये पसरत आहेत. गुजरात राजस्थानमध्ये सध्या चांदीपुरा हा विषाणू पसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांना प्रभावित करत आहे. तसेच या विषाणूची गंभीर लक्षणे दिसून आली आहेत.चांदीपुरा या विषाणूने गुजरातमधील अरवली आणि साबरकांठा जिल्ह्यांना मोठ्या प्रभावित केले आहे. तसेच तिथे असलेल्या सहा बालकांचा चांदीपुरा या विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल म्हणाले, राज्यात चांदीपुरा विषाणूचा प्रभाव झाल्याने सहा बालकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नमुन्याच्या तपासणीचा निकाल आल्यानंतरच नेमका कशामुळे मृत्यू झाला या मागचे कारण समजू शकेल. चांदीपुरा व्हायरल एन्सेफलायटिस या विषाणूंमुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पण सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये पसलेल्या विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.