
आजच्याकालच्या धागधुगीच्या जीवनांत अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. चांगल्या आरोग्यसाठी नियमित पौष्टिक आहार आणि खाण्याच्या वेळांकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे असते. उत्तम आरोग्यसाठी आपल्या आहारात प्रथिनांचा समावेश करणे फार गरजेचे असते. आपले शरीर सुरळीत चालावे, यासाठी आहारात प्रथिनांचा समावेश फार महत्त्वचा आहे. आज तुम्हाला अशाच काही प्रथिनांनी भरपूर डाळींविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहोत. यांच्या सेवनाने तुमच्या शरीरात कधीही पप्रथिनांची कमतरता फसणार नाही.
शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहारतज्ञांकडून दिला जातो. कडधान्ये हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. यात फक्त प्रथिनेच नव्हे तर जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील आढळली जातात. यांच्या नियमित सेवनाने हाडांची मजबुती राखण्यास आणि चेहऱ्याची त्वचा उत्तम राखण्यास मदत मिळते.
या डाळींमध्ये आहे प्रथिनांचे भरपूर प्रमाण
[read_also content=”उन्हाळयात त्वचेवर येणारी खाज, घामोळे ‘या’ दोन पानांच्या वापराने नाहीशी होईल https://www.navarashtra.com/lifestyle/in-summer-itching-sweating-problems-will-disappear-with-the-use-of-these-two-leaves-541044.html”]
सोयाबीन
तुम्ही अनेकदा सोयाबीनची भाजी खाल्ली असेल. सोयाबीनचे सेवन आरोग्यसाठी चांगले मानले जाते. यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांचे मुबलक प्रमाण आढळले जाते. हाडे मजबूत ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास याचा फायदा होत असतो.
राजमा
राजमा चावल हा खाद्यपदार्थ तुम्हाला माहित असावा. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यात हा पदार्थ अधिकतर खाल्ला जातो. यांत प्रोटीन्सचे भरपूर प्रमाण आढळले जाते, जे शरीरासाठी फायदेकारक ठरते.
मूग डाळ
मूग डाळ ही प्रोटिन्स आणि फायबरचे एक स्रोत आहे. मूग डाळीपासून अनेक चमचमीत पदार्थ बनवले जातात. जसे की, मुगाच्या डाळीची खिचडी. प्रोटीनच्या कमतरतेसाठी आहारात मुगाच्या डाळीचा समावेश करा.
तूर डाळ
घरघरात वापरली जाणारी तूर डाळ फायबर, प्रोटिन्स आणि अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असते. आहारात या डाळीचा समावेश केल्याने अनेक आजरांपासून सुटका मिळवता येते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी ही डाळ बरीच उपयुक्त ठरते.
उडीद डाळ
उडदाच्या डाळीलादेखील प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणून ओळखले जाते. मधुमेहासाठी आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.