स्ट्रेचिंग केल्याने आरोग्याला होणारे फायदे
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे, आहारात तज्ज्ञांकडून डाईट घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण नुसताच व्यायाम आणि आहारात घेऊन शरीर निरोगी राहत नाही. यासाठी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. स्ट्रेचिंग केल्याने आरोग्याला सुद्धा अनेक गुणकारी फायदे होतात. स्नायू आणि हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करावे. कामाच्या धावपळीमध्ये स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ भेटत नाही. एकाच जागेवर बसून तासनतास काम केल्याने शरीर पूर्णपणे ताठ होऊन जाते. अशावेळी शरीर लवचिक राहण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करावे. जेणेकरून शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत राहून आरोग्याला सुद्धा फायदे होतील. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यावर नियमित स्ट्रेचिंग केल्याने आरोग्याला काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्ट्रेचिंग केल्याने आरोग्याला होणारे फायदे
स्ट्रेचिंग केल्यामुळे सांधेदुखी आणि स्नायू दुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. स्ट्रेचिंग केल्यामुळे स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
कामाचा ताण, कौटुंबिक ताण इत्यादींमुळे मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून गेले आहे. अशांत मनाला शांत करण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित स्ट्रेचिंग करावे. यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील इतर भागांमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते.
स्ट्रेचिंग केल्याने आरोग्याला होणारे फायदे
अपुऱ्या झोपेमुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे नियमित स्ट्रेचिंग करावे. स्ट्रेचिंग केल्यामुळे झोप चांगली लागून झोप सुधारते. शरीराला आराम मिळतो.
तासनतास एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे पाठदुखीचा त्रास जाणवू लागतो. पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीराची हालचाल करणे सुद्धा कठीण होऊन जाते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित स्ट्रेचिंग करावे. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरीरात लवचिकता कायम टिकून राहते.नियमित स्ट्रेचिंग केल्यामुळे पाठीचा वाकलेला कणा ताठ होऊन खांदे दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.