
कोरफड जेलमध्ये मिक्स करू नका 'हे' पदार्थ
नैसर्गिक गुणधर्म असलेल्या कोरफडचा वापर आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील केला जातो. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल वापरले जाते. त्वचेवरील डाग, पिंपल्स किंवा पुरळ दूर करण्याचे काम कोरफड करते. सर्दी खोकला झाल्यानंतर कोरफडीच्या गरापासून काढा बनवला जातो. त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर करण्याचे काम कोरफड करते. कोरफड जेलमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे केस आणि त्वचेसाठी वरदान आहेत. कोरफड जेल त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून देखील वापरले जाते.
त्वचेसाठी गुणकारी असलेल्या कोरफडीपासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क आणि फेस मास्क बनवले जातात.फेस मास्क तयार करताना कोरफड जेलमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ मिक्स केले जातात. हे पदार्थ मिक्स केल्यामुळे कोरफड जेलचा प्रभाव कमी होऊन जातो. त्वचेवर हवतास चमकदार ग्लो दिसून येत नाही. त्यामुळे कोरफड जेल मध्ये कोणते पदार्थ मिक्स केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. कोरफड जेल त्वचेसाठी प्रभावी आहे. त्यामध्ये असलेल्या गुणधर्मांनी त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते.(फोटो सौजन्य-istock)
कोरफड जेलमध्ये मिक्स करू नका ‘हे’ पदार्थ
लिंबूमध्ये असलेले सायट्रिक अॅसिड त्वचेला ब्लिच करते. पण हाच लिंबाचा रस कोरफड जेलमध्ये टाकला तर त्वचा खराब होण्याची शक्यता असते.कोरफड जेलमधील गुणधर्म लिंबू कमकुवत करून टाकतो. त्यामुळे कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिक्स करू नये. असे केल्यास त्वचेवर जळजळ किंवा पुरळ येऊ शकतात.
कोरफड जेलमध्ये मिक्स करू नका ‘हे’ पदार्थ
कोरफड जेलमध्ये दूध मिक्स करू नये. असे केल्यास कोरफड जेलमधील गुणधर्म निघून जातात. दुधामध्ये असलेले फॅटस कोरफड जेलमध्ये मिक्स केल्यास त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाते. त्यामुळे दुधाऐवजी कोरफड जेलमध्ये नारळाचे पाणी टाकावे.
कोरफड जेलमध्ये मिक्स करू नका ‘हे’ पदार्थ
कोरफड जेलचा वापर करून फेस मास्क किंवा हेअरमास्क तयार करताना त्यात गरम पाणी टाकू नये. गरम पाणी टाकल्यामुळे त्वचेला खाज किंवा त्वचेला सूज येऊ शकते. त्यामुळे कोरफड जेलमध्ये थंड पाण्याचा वापर करावा.
कोरफड जेलमध्ये मिक्स करू नका ‘हे’ पदार्थ
निरोगी त्वचेसाठी तुरटी हा पदार्थ हानिकारक आहे. तुरटीमध्ये कोरफड जेल मिक्स केल्याने त्वचेला खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोरफड जेलमध्ये तुरटी टाकण्याऐवजी ग्रीन टी किंवा काकडीचा रस मिक्स करावे. हे नैसर्गिक पदार्थ मिक्स केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.